आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाहितेवर बलात्कार करून तयार केला व्हिडिओ, घटनेनंतर 24 तासांत आरोपी जेरबंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरोपींना न्यायालयात नेताना पोलिस. - Divya Marathi
आरोपींना न्यायालयात नेताना पोलिस.
औरंगाबाद - विवाहित महिलेवर अत्याचार करून चित्रफीत तयार करणाऱ्या तिघांना सिडको पोलिसांनी अटक केली. ही घटना मिसारवाडी भागात घडली. प्रवीण ऊर्फ पऱ्या सोपान साबळे (२५, रा. आंबेडकरनगर, इसारवाडी), राहुल दगडू खाजेकर (२१, रा. साईनगर, मिसारवाडी) आणि गणेश आण्णा फुलपगार (२६, रा. फुलेनगर, मिसारवाडी ) अशी आरोपींची नावे आहेत.
मिसारवाडी परिसरात ३५ वर्षांच्या विवाहित महिलेवर अत्याचार करून त्याची चित्रफीत करणाऱ्या तिघांना सिडको पोलिसांनी घटना घडल्यानंतर २४ तासांच्या आत जेरबंद केले. १५ जुलै रोजी संध्याकाळी सातच्या सुमारास तिघे पीडित महिलेच्या घरी गेले. ती घरात एकटी असल्याचे पाहून पऱ्या घरात शिरला. गणेश घराच्या बाहेर लक्ष ठेवण्यासाठी थांबला. पऱ्या अत्याचार करत असताना राहुल याने मोबाइलवर चित्रीकरण केले. पीडित महिलेने पोलिसात तक्रार दिली. तिघेही घटनास्थळापासून जवळच दारू पीत बसले होते. ही माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी शिताफीने अटक केली.
आरोपी सराईत गुन्हेगार
अत्याचार करणारा पऱ्या हा सराईत गुन्हेगार आहे. राहुल खाजेकरवर यापूर्वीदेखील अत्याचाराचा गुन्हा दाखल आहे. गणेशवरही किरकोळ स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. पोलिस निरीक्षक राजकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजकुमार पाडवी, सहा. निरीक्षक जेकब, बडगुजर, यांनी ही कारवाई केली.