अजिंठा - शहरात बलात्काराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून त्याचे लोण आता ग्रामीण भागातही पसरत आहे. अशीच घटना सिल्लोड तालुक्यातील घटांब्री शिवारात घडली. ओळखीचा फायदा घेत दोन तरुणांनी महाविद्यालयीन मुलीला दुचाकीवरून लिफ्ट देण्याच्या बहाण्याने जवळ असलेल्या शेतात नेऊन एकाने बलात्कार केला. ही घटना ३ सप्टेंबर रोजी घडली.
याप्रकरणी बलात्कार करणारा, त्यावर पाळत ठेवणारा व मोबाइलमध्ये शूटिंग करणारे तीन असे एकूण पाच जणांविरुद्ध ७ सप्टेंबर सोमवार रात्री अल्पवयीन मुलीच्या िफर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. मंगळवारी पाच जणांना पोलिसांनी अटक केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची अधिक माहिती अशी की, एक सोळावर्षीय मुलगी (रा. हट्टी, ता. सिल्लोड) ही गुरुवारी हट्टीहून अंभईला जाण्यासाठी केघाली होती. घटांब्रीपर्यंतच गाडी असल्याने ती घटांब्री फाट्याजवळ अंभई, उंडणगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर उतरली. आरोपी मनोज पुंजाराम मघाडे (२०), समाधान सीताराम भोटकर (२१, रा. हट्टी फाटा) हे दोघे दुचाकीवर अंभईकडे जात होते. मुलाला पाहून मनोज म्हणाला, ‘चल, गाडीवर बस. आम्ही तिकडेच चाललो.’ कॉलेजला उशीर होत असल्याने ती गाडीवर बसली. मात्र, मनोजने तिला एका निर्जन स्थळी नेत बलात्कार केला. या घटनेवर समाधान भोटकर हा पाळत ठेवत होता. तेवढ्यात तेथे इम्रानखाँ आरिफखाँ (२२), आबेद याकूब शेख (२१), इम्रान कदीर पठाण (२२, सर्व रा. अंभई) हे तिघे वाटसरू मोबाइलमध्ये शूट करत होते. शूटिंग डिलिट करण्यासाठी तीन हजार रुपये दे व आम्हाला शरीर संबंध ठेवू दे, अशी मनोजशी हुज्जत घालत होते. यांच्या वादावादीचा फायदा घेत मुलगी तेथून निसटली व घरी पोहोचली. मुलगी तीन दिवसांपासून उदास दिसत असून कॉलेजमध्येदेखील जात नसल्याने आईने तिला विश्वासात घेऊन विचारले असता ही धक्कादायक बाब उघड झाली. ७ सप्टेंबर रोजी त्वरित अजिंठा पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पाचही आरोपींच्या मुसक्या आवळल्या. मनोज मघाडे याच्यावर बलात्काराचा, तर इतर तीन आरोपींवर ब्लॅकमेल, एकावर पाळत ठेवण्याचा असे गुन्हे दाखल करण्यात आले.
धीराने मुलीला बळ
बलात्कार झाल्यापासून मुलगी घरात घाबरलेल्या स्थितीत होती. कोणाशी काही बोलत नव्हती. जेवत नव्हती. तीन- चार दिवस झाले मुलगी कॉलेजला जात नाही. बाहेर जात नाही. म्हणून आईने तिला विश्वासात घेतले. बाळ, काय झाला सगळे सांग, मी तुझी आई ना? मला नाही तर कुणाला सांगणार? असे म्हणून मुलीला बोलते केले व पोलिस स्टेशन गाठून त्या नराधमाविरुद्ध गुन्हे दाखल केले.
पुढील स्लाइडवर वाचा नेमकी कशी घडली घटना...