आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rape Attempt Teen Age Girl At Mhaismal Village Near Khulatabad

म्हैसमाळ गावात अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खुलताबाद- म्हैसमाळ गावात एका नराधमाने दारूच्या नशेत अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. म्हैसमाळ येथे साडेपाच वर्षांची अल्पवयीन मुलगी घरासमोर लहान मुलींसोबत खेळत होती. त्यादरम्यान आरोपी पूनम मेहर (20, रा. म्हैसमाळ) याने गुरुवारी ऊस देण्याच्या बहाण्याने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला.
मुलीच्या आईने मुलीला घेऊन खुलताबाद पोलिस ठाणे गाठले. पोलिस निरीक्षक संभाजी डौले यांना झालेला प्रकार सांगितला. पोलिस निरीक्षकांनी पीडित मुलीला तत्काळ औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश दिले.