आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विवाहितेशी अश्लील चाळे करणारा भोंदूबाबा गजाआड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सादातनगर सासर असलेल्या एका अठरावर्षीय पीडित विवाहितेने शरीरसंबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणार्‍या अब्दुल मतीन शहाबाबा या ढोंग्याविरुद्ध सातारा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पीडितेच्या पतीसह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. शनिवारी (28 जून) पोलिस आयुक्त राजेंद्र सिंह यांच्या आदेशान्वये विनयभंग, कटकारस्थान करणे, डांबून ठेवण्याचा गुन्हा त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आला.
अहमदाबाद आणि औरंगाबादेतील सादातनगर येथे अब्दुल्ला या ढोंगीबाबाचा तथाकथित आर्शम (खानखाँ) आहे. कधी अहमदाबाद, तर कधी सादातनगर येथे अब्दुल्लाबाबा मुक्काम ठोकायचा. विवाहापूर्वी पीडित युवतीचे वडील या अब्दुल्लाबाबाच्या खानखाँमध्ये जाऊन भेट घेत असे.
15 मे 2014 रोजी आपल्या तिन्ही मुलींना घेऊन बाबांची त्यांनी भेट घेतली. त्या वेळी बाबांच्या खानखाँमध्ये उपस्थित असलेल्या मुलासोबत दोन दिवसांत तीनपैकी एका मुलीचा विवाह केला नाही तर मुलीचे लग्न होणार नसल्याचा इशारा बाबाने दिला होता. त्यानंतर 16 मे 2014 रोजी तातडीने पीडित युवतीचा आर्शमातच शेख झिशानसोबत विवाह करून देण्यात आला. त्यानंतर पतीने आपल्याला मारहाण केल्याचे विवाहितेने तक्रारीत म्हटले आहे. यावर तोडगा निघावा म्हणून पतीने पत्नीला 20 मे 2014 रोजी बाबांच्या आर्शमात सोडून दिले. त्यानंतर अब्दुल्लाबाबांनी आर्शमातील महिला शमिनाच्या मदतीने आपल्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्या भामट्याचे खरे रूप सर्वांसमोर आणण्याचे सांगितल्यावर आई-वडिलांना जिवे मारण्याची त्याने धमकी दिली. त्यानंतर मात्र आपल्याला पंधरा दिवस आर्शमात डांबून ठेवले. 20 जून रोजी सुटका झाल्यानंतर घरी आल्यावर आईसमोर सर्व हकिगत मांडली. त्यानंतर 28 जून रोजी पोलिस आयुक्तांच्या निदर्शनास ही घटना पीडितेने आणून दिली. गुन्हे शाखेचे प्रभारी सहायक पोलिस आयुक्त तथा पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांना तक्रारीतील सत्यता पडताळून सातारा पोलिसांना गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले. त्यानंतर 28 जून रोजी सातारा ठाण्यात पती, सासू, आर्शमातील महिला आणि बाबाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

सर्व आरोपींना केले जेरबंद
अब्दुल मतीन शहाबाबा, शेख झिशान, शमिना आणि पीडितेच्या सासूविरोधात कटकारस्थान करणे (114 ब, 109), डांबून ठेवणे (344), विनयभंग करणे (354) भारतीय दंडविधानच्या आदी कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली. पोलिस निरीक्षक कैलास प्रजापती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक तुषार देवरे तपास करत आहेत.
चौघांच्या विरोधात सातारा पोलिसांची कारवाई