आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जोगेश्वरीत नऊ वर्षाच्या मुलीवर तरूणाकडून बलात्कार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज: नऊ वर्षे वयाच्या मुलीवर सतरा वर्षे वयाच्या मुलाने बलात्कार केल्याचा प्रकार जोगेश्वरीमध्ये समोर आला आहे. नोव्हेंबर महिन्यात ही घटना घडली होती, पण मारण्याची धमकी दिल्याने, मुलीने कोणालाही काही सांगितले नव्हते. दोन दिवसांपूर्वी त्या मुलीने आईला सर्व हकीकत सांगितल्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी रात्री त्या मुलास आणि त्यास मदत करणार्‍या चांदनाना (65)ला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
उत्तर प्रदेशातून उदरनिर्वाहासाठी आलेले एक कुटुंब जोगेश्वरीच्या झोपडपट्टीत वास्तव्यास आहे. त्यांची जुबेदा (नाव बदलले) ही नऊ वर्षे वयाची मुलगी आहे.
जुबेदा 7 नोव्हेंबरला सकाळी 11 च्या सुमारास बकरी ईद मागण्यासाठी त्या मुलाच्या घरी गेली होती. त्यावेळी घरात 65 वर्षीय चांदनाना आणि बलात्कार करणारा 17 वर्षीय मुलगा बसलेले होते. त्या मुलाने जुबेदाला घरात ओढून नेले. त्यानंतर चांदनाना घराला बाहेरून कडी लावून निघून गेला. त्यानंतर मुलाने तिच्यावर बलात्कार केल्यामुळे ती रडायला लागली. त्यानंतर चांदनाना पुन्हा तेथे आला. त्याने जुबेदाला ही घटना कोणाला सांगितल्यास जाळून मारण्याची धमकी दिली. त्यामुळे भीतीपोटी तिने कोणालाही यासंबंधी काही सांगितले नाही.