आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत अपहरण करून मांत्रिकाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - घरासमोरील१४ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर सलग आठ दिवस अत्याचार करणारा ढाेंगी मांत्रिक मुकुंदवाडी पोलिसांच्या जाळ्यात अडकला. कुकर्म उघड होण्याच्या भीतीपोटी तो पोलिसांच्या हालचाली टिपण्यासाठी पोलिस ठाण्यात जाऊन पोलिसांच्या पुढे पुढे करायचा. मात्र, पीडित मुलीने वडिलांना फोन केल्यानंतर त्याचे बिंग फुटले. मंगळवारी पहाटे या मांत्रिकासह स्कॉर्पिओ चालकाला मुकुंदवाडी पोलिसांनी अटक केली. फकिरबा दाभाडे (५२, रा. मुकुंदनगर) आणि पंढरीनाथ हिवर्डे अशी दोघांची नावे आहेत.

मुकुंदवाडी येथे राहणाऱ्या फकिरबा दाभाडेची घराजवळच राहणाऱ्या १४ वर्षीय मुलीच्या वडिलांशी ओळख होती. या ओळखीतून दाभाडे हा नेहमीच त्या मुलीच्या घरी जायचा. आपल्याला मांत्रिक विद्या येते, असे म्हणत दाभाडेने मुलीला जाळ्यात ओढले होते. पीडितेच्या घरची परिस्थिती हलाखीची असल्याने दाभाडे आर्थिक मदत करायचा. पाच जुलै रोजी दाभाडेने मुलीला देवळाई चौकातून आपल्या स्कॉर्पिओमध्ये बसवून वाळूज एमआयडीसी भागात नेले. रांजणगावात एक खोली भाड्याने घेऊन तिला तेथे ठेवले. उत्तेजक गोळ्या सेवन करत तिच्यावर सलग आठ दिवस अत्याचार केला.

अशी झाली आरोपींना अटक
मुकुंदवाडीपोलिसांनी खात्री करण्यासाठी पोलिस शिपाई संदीप सानप यांना बुलडाण्याला पाठवले. याचदरम्यान पुन्हा दाभाडेने स्कॉर्पिओ चालक हिवर्डेसह मुलीला बुलडाण्याला नेले असता मुकुंदवाडी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास औरंगाबादला आणले. यानंतर पीडितेच्या तक्रारीवरून मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या पीडितेवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दोघांच्या विरोधात कलम ३६३ आणि ३७३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दाभाडेचा बनाव
मुलगीबेपत्ता झाल्याने तिचे वडील हैराण झाले होते. जुलै रोजी १४ वर्षीय मुलीचे देवळाई चौकातून अपहरण झाल्याची तक्रार तिच्या पित्याने मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात केली होती. मुलीवर दररोज अत्याचार करून तो तिच्या वडिलांसोबत पोलिस ठाण्यातही मिरवायचा. त्यामुळे मुलीच्या वडिलांना पोलिसांना त्याच्यावर संशय येत नव्हता. रांजणगावात एका खोलीत डांबून तो तिच्यावर अत्याचार करत होता. याचदरम्यान त्याने पीडितेला बुलडाणा येथे नेले होते. त्या वेळी पीडितेने वडिलांशी दाभाडेच्याच मोबाइलवरून संपर्क साधला असता दाभाडेने मोबाइल हिसकावून सिम कार्ड तोडून फेकून दिले. पित्याने पोलिसांना आपल्या मुलीचा बुलडाण्यावरून फोन आल्याचे सांगितले. त्यावरून पोलिसांनी सिम कार्डधारकाचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. तेव्हा दाभाडे याचे नाव समोर आले.
बातम्या आणखी आहेत...