आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्याध्यापकाचा 25 वर्षीय विवाहितेवर बलात्कार, शीतपेयातून पाजले गुंगीचे औषध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खुलताबाद - तालुक्यातील गल्लेबोरगाव येथील मुख्याध्यापकाने विवाहितेला शीतपेयात गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपी मुख्याध्यापकावर खुलताबाद पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल  करण्यात आला आहे. संदीप खोसरे असे आरोपी मुख्याध्यापकाचे नाव असून तो फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. संदीप हा काँग्रेसच्या माजी तालुकाध्यक्षाचा मुलगा आहे.   
 
२५ वर्षीय पीडित विवाहिता पतीसोबत वाद झाल्याने गेल्या काही दिवसांपासून कन्नड येथे माहेरी राहते. मंगळवारी (२३ मे) ती औरंगाबाद येथे परीक्षेसाठी गेली होती. यादरम्यान संदीप खोसरे याने तिला वारंवार फोन केले. पेपर सुरू असल्याने ती कॉल घेऊ शकली नाही. पेपर संपल्यानंतर तिने “मला फोन कशासाठी केला?’ असे संदीप यास विचारले असता त्याने तिच्याकडे “तू कोठे आहेस?’ अशी विचारणा केली. तेव्हा तिने औरंगाबाद येथे पेपर देऊन कन्नडला जात असल्याचे संदीप यास सांगितले. तेव्हा संदीपने तिला वेरूळ येथे उतरण्यास सांगितले. त्यामुळे विवाहिता वेरूळ येथे उतरली. आरोपीने तिला वेरूळ येथील कैलास गेस्ट हाऊसमध्ये नेले. तेथे शीतपेयात गुंगीचे औषध पाजून तिच्यावर बलात्कार केला. विवाहिता शुद्धीवर आल्यानंतर घडला प्रकार तिच्या लक्षात आला. संदीप याने ही  बाब कोणाला सांगितल्यास तुला जिवे मारीन, अशी धमकी दिली.  

खुलताबाद पोलिस ठाण्यात तक्रार  
पीडित विवाहितेने बुधवारी  खुलताबाद पोलिस ठाणे गाठून संदीप खोसरेविरुद्ध तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्याचा शोध घेतला, मात्र तो फरार झाला आहे. संदीप खोसरे हा गल्लेबोरगाव येथील नाथ माध्यमिक विद्यालयाचा मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे. तपास पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग याच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दुर्गेश राजपूत करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...