आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नोकरीचे आमिष दाखवून बलात्कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- हर्सूल भागातील एका सहकारी संस्थेच्या वाहनचालकाने नोकरीचे आमिष दाखवून ३० वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी सहकारी संस्थेच्या वाहनचालकावर क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हा हर्सूल येथे त्याच संस्थेत काम करत असून तपासासाठी त्याचे नाव पोलिसांनी गुप्त ठेवले आहे.
सदरील आरोपीने संस्थेमध्ये स्वयंपाकीणबाईची नोकरी लावून देतो म्हणून ३० वर्षीय महिलेकडून जानेवारी २०१५ पासून आतापर्यंत वेळोवेळी पैशाची मागणी करीत दीड लाख रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर नोकरीचा बहाणा करून नराधमाने त्या महिलेस बाहेरगावी जावयाचे असे म्हणून तिला शिर्डी, मुंबई आणि पुणे येथे नेऊन तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला. त्या महिलेने नोकरीच्या ठिकाणासंदर्भात त्याच्याकडे चौकशी केली त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्या महिलेने क्रांती चौक पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध फसवणूक आणि बलात्काराची तक्रार दिली. त्यावरून क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपी फरार आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पथके रवाना झाली आहेत. त्या महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून वैद्यकीय अहवाल अद्याप प्राप्त झाला नसल्याचे पोलिस निरीक्षक गोवर्धन कोळेकर यांनी सांगितले. आरोपी हा संस्थाचालकाच्या गाडीवर चालक असल्याचे समोर आले आहे.
बातम्या आणखी आहेत...