आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rape On Minor Girl In Kannad, Three Person Arrested

कन्नडमध्‍ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार; तिघांवर गुन्हा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कन्नड - हिवरखेडा नांदगीरवाडी येथील पंधरावर्षीय अल्पवयीन मुलीवर एकाने जिवे मारण्याची धमकी देत बलात्कार केल्याची घटना गुरुवारी ( 16 जानेवारी) घडली. यासंदर्भात तिघांविरुद्ध कन्नड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमवारी (6 जानेवारी) संध्याकाळी सादिक अय्यूब पठाण (27) याने त्याच्या नात्यातील पंधरावर्षीय मुलीला घरी जाऊन सांगितले की, तुझ्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यांना औरंगाबादच्या दवाखान्यात नेण्यात आले आहे, असे सांगून तिला रात्री 10 वाजेच्या सुमारास दुचाकीवरून राजेराय टाकळी (ता. खुलताबाद) येथे आणले. त्यानंतर आता रात्र झाली आहे. माझा आतेभाऊ येथे राहतो. आपण तेथेच थांबू व सकाळी औरंगाबादला जाऊ, असे सांगितले. आतेभाऊ अफरोज शेख गुलाब (32) याच्या घरी नेऊन सादिकने रात्री चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार के ला. त्यानंतर माझ्यासोबत लग्न करत असशील, तर तुला घरी सोडतो, असे म्हणून 3 दिवस डांबून ठेवले. या वेळी मुलीने आरडाओरड केली; परंतु अफरोज तसेच त्याची पत्नी नजिरा शेख अफरोज (28) ने कोणतीही मदत केली नाही. त्या घटनेनंतर तिला चिकलठाणा येथे आणून सोडले. 15 जानेवारी रोजी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सादिक अय्यूब पठाण, अफरोज शेख गुलाब व नजिरा शेख अफरोज या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक खुशाल शिंदे, सहायक पोलिस निरीक्षक दिलीप सागर करत आहेत. अफरोजला जळगाव येथून अटक करण्यात आली आहे.