आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावच्या तरुणीवर अतिप्रसंग; विस्तार अधिकार्‍याविरोधात गुन्हा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- जळगाव येथून फूस लावून पळवून आणलेल्या 24 वर्षीय तरुणीला शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार करणार्‍या विस्तार अधिकार्‍यासह त्याला मदत करणार्‍या एका महिलेविरुद्ध बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

जळगाव येथील महिला व्यवसाय प्रशिक्षण विभागाचा विस्तार अधिकारी हेमराज मनोहर पारधेकर व याच विभागातील नियंत्रक पूनम राजेंद्र पाटील या दोघांनी जळगाव शहरातील एका 24 वर्षीय तरुणीला ऑक्टोबर 2013 मध्ये फूस लावून औरंगाबाद शहरात आणले होते. या तरुणीसह तिघांनी सुभेदारी विश्रामगृहात मुक्काम केला. रात्री हेमराज व पूनम यांनी तरुणीला शीतपेयातून गुंगीचे औषध पाजले. नंतर हेमराजने तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणात नऊ महिन्यांनंतर 20 जुल रोजी जळगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. मात्र हे प्रकरण शहरातील बेगमपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने ते बेगमपुरा पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. महिला पोलिस उपनिरीक्षक वर्षा बगाडे पुढील तपास करत आहेत.