आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहिणीच्या दिराकडून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - बहिणीच्या बाळंतपणासाठी वाळूजला आलेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर मद्यप्राशन करून दिराने बलात्कार केला. त्यानंतर पीडिता गर्भवती राहिली. त्यामुळे पीडितेच्या नातलगांनी पोलिसांत धाव घेेतली. तेव्हा अकाेला येथील बाल संरक्षण अधिकारी करुणा मोहनराव महंतारे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी उमेश साहेबराव तायडे (रा. वाळूज) याच्याविरुद्ध गुरुवारी गुन्हा नोंदवला आहे.
पीडित अल्पवयीन मुलगी अकाेला जिल्ह्यातील रहिवासी आहे. तिची बहीण वाळूजला राहते. महिन्यांपूर्वी पीडितेच्या बहिणीचे बाळंतपण होते. त्यासाठी पीडित मुलगी वाळूजला बहिणीकडे आली होती. तेव्हा बहिणीचा दीर उमेश तायडे याने मद्यप्राशन करून पीडितेवर बलात्कार केला. मात्र, तिने ही बाब कुणालाही सांगितली नाही. त्यानंतर पीडिता तिच्या गावी गेली; परंतु पीडितेला गर्भ राहिल्याचे लक्षात आल्याने तिने तिच्या नातलगांना सर्व प्रकार सांगितला. नातलगांनी तिला घेऊन अकाेला पोलिस ठाणे गाठले. तेथील पोलिसांनी तिची महिला कक्षात चौकशी केली. तेव्हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर बाल संरक्षण अधिकारी करुणा महंतारे यांनी अकोला पोलिसांत आरोपी उमेश तायडेविरुद्ध तक्रार दिली. तक्रारीनंतर अकोला पोलिसांनी गुन्हा नोंदवून तो वाळूज पोलिसांकडे गुरुवारी वर्ग केला आहे. या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक अर्चना पाटील तपास करत आहेत.