आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपीला सक्तमजुरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- अल्पवयीनमुलीवर बलात्कारप्रकरणी आरोपी शकील मस्तान पठाण (१९) याला जिल्हा सत्र न्यायाधीश एस. बी. कचरे यांनी सात वर्षांची सक्तमजुरी आणि हजार दंडाची शिक्षा ठोठावली. आरोपी सिल्लोड तालुक्यातील अन्वी येथील रहिवासी आहे. त्याच्यावर सिल्लोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नोव्हेंबर २०१० रोजी अन्वी येथील आठ वर्षांची मुलगी आईसोबत शेतात कामासाठी गेली होती. महिला मिरच्या तोडत असताना तिची मुलगी कविटाच्या झाडाखाली बसली होती. या वेळी शकील मस्तान पठाण हा मुलीजवळ गेला. तिला कविट देण्याच्या आमिषाने बोलावून बाजूच्या नाल्यात नेऊन अत्याचार केला. मुलीने आरडाओरड केल्यानंतर तो पळून गेला. मुलीच्या आईने सिल्लोड पोलिस ठाण्यात तक्रारदिली. या प्रकरणात साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी डॉक्टरांची साक्ष महत्त्वाची ठरली. तपास अधिकारी म्हणून व्ही. एन. जटाळे यांनी काम पाहिले. सरकार पक्षातर्फे अॅड. सुदेश शिरसाठ यांनी काम पाहिले. न्यायालयाने आरोपीला ३७६ (२ फ) अन्वये सात वर्षांची शिक्षा ५००० दंड तसेच दंड भरल्यास महिन्यांची शिक्षा सुनावली, तर कलम ३७७ अन्वये वर्षांची शिक्षा आणि हजार रुपये दंड ठोठावला आहे.