आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलात्काऱ्यास वर्षे सक्तमजुरी, अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अनेक शहरांत फिरवून अत्याचार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सातारा भागातील रणजितनगर येथील अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या अविनाश पुंजाराम बुवा या तरुणास अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एल. पठाण यांनी सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.
१९ एप्रिल २०१४ रोजी १७ वर्षीय युवती स्कूटीवरून महाविद्यालयात गेली होती. दुपारी चार वाजेपर्यंत ती ग्रंथालयात बसली होती. मुलगी घरी कशी आली नाही म्हणून घरच्यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. तिच्याकडील मोबाइलही बंद होता. त्यांनी क्रांती चौक ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. हायकोर्ट काॅलनी, एकता रेसिडन्सीमधील अविनाश पुंजाराम बुवा याच्यावर संशय होता. आपल्या मुलीचे अपहरण अविनाशने केले असावे, असे त्यांनी तक्रारीत म्हटले होते. तपास अधिकाऱ्याने महाविद्यालयाच्या वाहनतळावर जाऊन चौकशी केली असता त्यांना स्कूटी सापडली. स्कूटीच्या डिकीमध्ये बंद मोबाइल आणि चिठ्ठी सापडली. या चिठ्ठीवरून पोलिसांना खात्री झाली की, अविनाशने अपहरण केले असावे. अविनाशने मुलीला सोबत चल, नाही तर हात कापून घेईन, असे धमकावून तिच्या आई - वडिलांना चिठ्ठी लिहिण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे चिठ्ठी लिहिली मोबाइलसह स्कूटीच्या डिकीत टाकून ती अविनाशसोबत गेली होती.

२७ एप्रिल २०१४ रोजी ही मुलगी घरी परत आली. तिला क्रांती चौक ठाण्यात नेण्यात आले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत तिने सांगितले की, अविनाशने आपल्याला निझामाबाद, मनमाड, मध्य प्रदेशातील खांडवा भोपाळ येथे नेले. भोपाळच्या एका लॉजमध्ये थांबवले आणि बलात्कार केला. दरम्यान, तिने विरोध केला म्हणून मारहाणही केली. नंतर तिला राज्यस्थानातील माधवपूर, मुंबई, पुणे आणि गोवा आदी शहरांत फिरवले आणि नंतर औरंगाबादला आणून सोडले. पोलिसांनी मुलीची घाटीत वैद्यकीय तपासणी केली असता तिच्यावर बलात्कार केल्याचा अहवाल वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून प्राप्त झाला. खटल्याची अंतिम सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एल. पठाण यांच्यासमोर झाली. तत्कालीन सहायक लोकअभियोक्ता राजेंद्र मुगदिया यांनी साक्षीदार तपासले. त्यात फिर्यादी, वैद्यकीय अधिकारी, शाळेचे शिक्षक यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. आरोपीला शिक्षा व्हावी यासाठी सहायक लोकअभियोक्ता बी. आर. लोया यांनीही युक्तिवाद केला. या गुन्ह्यात वर्षे सक्तमजुरी, हजार रुपये दंड, दंड भरल्यास महिने साध्या कैदेची शिक्षा अल्पवयीन मुलीस पळवून नेले म्हणून वर्षे सक्तमजुरी, हजार रुपये दंड, दंड भरल्यास महिने साधी कैद अशी शिक्षा न्यायालयाने ठोठावली.
बातम्या आणखी आहेत...