आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rapist Khojekar Arrested In Dhopateshvar In Aurangabad

खोलीत कोंडून ठेवून तरुणीवर बलात्कार करणाऱ्या नराधम खोजेकर अखेर अटकेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद/ बदनापूर- दीडमहिना खोलीत कोंडून ठेवून तरुणीवर बलात्कार करणाऱ्या प्रल्हाद खोजेकर याला जालना पोलिसांनी मंगळवारी बदनापूरजवळ धोपटेश्वर येथील त्याच्या घरातून अटक केली. ही तरुणी गतिमंद असल्याचा दावा पोलिसांनी केला असून तिच्यावर अजून काही लोकांनी अत्याचार केल्याचा संशय गावकऱ्यांना आहे.

दिवसभर या घटनेची चर्चा गावात होती. प्रल्हाद हा २५ ते ३० वर्षाचा असून गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. दीड वर्षापूर्वी त्याचे लग्न झाले होते. मात्र महिन्यातच बायको त्याला सोडून निघून गेली. तेव्हापासून तो एकटाच रहात होता. दीड महिन्यापूर्वी राधिका (नाव बदलेले आहे )हिला त्याने घरात आणले. तो रोज तिच्यावर अत्याचार करायचा. याबाबत आई, भाऊ किंवा भावजयीने विचारले असता, त्यांना मारहाण करायचा. जिवाचे बरेवाईट करून घेण्याची धमकी द्यायचा. गावकऱ्यांना ही माझ्या मामाची मुलगी आहे, असे तो सांगत होता.