आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rare Books, Books Buying Chance In Book Exhibition

दुर्मिळ ग्रंथ, पुस्‍तकांच्‍या खरेदीची संधी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- जिल्हा माहिती कार्यालयातर्फे मराठवाडा साहित्य परिषदेत ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात सहभागी झालेल्या प्रकाशन संस्थांनी चोखंदळ वाचकांसाठी दुर्मिळ ग्रंथ आणि पुस्तक सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिले आहे. शनिवारी या ग्रंथोत्सवाचा शेवटचा दिवस आहे.

व. पू. काळे, पु. ल. देशपांडे, वि. स. खांडेकर, सुधा मूर्ती, शंकर पाटील, आचार्य अत्रे, फ. मुं. शिंदे, बहिणाबाई चौधरी, सुरेश भट यांच्यासह अगदी चेतन भगत आणि सलील कुलकर्णीपर्यंत विविध प्रकारच्या कथा आणि कादंबर्‍या या महोत्सवात उपलब्ध आहेत. या शिवाय मराठी विश्वकोश, शिक्षक हस्तपुस्तिका, विविध जिल्ह्यांचे गॅझेटियर, स्पर्धा परीक्षा, सामान्य ज्ञान, मोटिव्हेशनल, निवडक किशोर अशा प्रकारचे दज्रेदार पुस्तक 15 ते 30 टक्के सवलतीच्या दरात शासकीय संस्थांनी उपलब्ध करून दिली आहेत, तर काही पुस्तक विक्रेत्यांनी घरपोच वाचनालयाची सुविधासुद्धा उपलब्ध करून दिली आहे. या महोत्सवाचे विशेष म्हणजे या महोत्सवात स्थानिक प्रकाशक आणि स्थानिक लेखकांनी साकारलेल्या साहित्यकृती वाचकांसाठी उपलब्ध आहेत.

कथा, कांदबर्‍यांसह मोटिव्हेशनल बुककडे ओढा
मृत्युंजय, ययाती, वन नाइट अँट कॉल सेंटर, वाइज अँड वॉदर वाइज, अमृतवेल, पार्टनर या गाजलेल्या पुस्तकांबरोबरच मराठी विश्वकोश, संविधान यासह स्पर्धा परीक्षा आणि मोटिव्हेशनल पुस्तके खरेदी करण्याकडे तरुणांचा कल आहे. त्याचबरोबर अनुपम खेरच्या तुमच्यातील सवरेत्तम बाब म्हणजे तुम्हीच या पुस्तकाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे.