औरंगाबाद- पिंपळवाडी(ता. पैठण) येथील ४० वर्षीय सुनीता ताराचंद परदेशी यांचा १६ डिसेंबरला ढोरकीन येथे अपघात झाला. खांद्याच्या हाडाचा पुढचा भाग छातीचा पिंजरा तोडून फुप्फुसाजवळ जाऊन फसला होता. घाटीतील शस्त्रक्रिया आणि अस्थिरोग अशा दोन विभागांनी मिळून सुनीता यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया यशस्वी केली. जगभरात आतापर्यंत अशा केवळ १५ ते २० घटना घडल्या. ही दुर्मिळ शस्त्रक्रिया तर घाटीच्या इतिहासातील पहिलीच शस्त्रक्रिया ठरल्याचे अस्थिरोग विभागप्रमुख डॉ. चंद्रकांत थोरात यांनी स्पष्ट केले.
१६ डिसेंबर २०१५ रोजी सुनीता छोट्या लोडिंग गाडीमध्ये घराकडे परतत असताना सायंकाळी ७.३० च्या सुमारास गाडी ढोरकीनजवळ पुलावरून खाली कोसळली. सुनीता गाडीमध्ये विचित्र पद्धतीने फसल्या होत्या. त्यांना खेचून बाहेर काढावे लागले होते.
अपघातात खांद्याला दुखापत झाली तर खांदा निखळून बाहेरच्या बाजूला जातो किंवा पाठीच्या बाजूला आत येतो. मात्र, छातीचा पिंजरा तोडून तो आत जाण्याची घटना दुर्मिळ आहे.
यांचाहोता सहभाग : सुनीतायांच्यावर उपचार करणाऱ्यांत माधुरी परदेशी, प्रतिभा कुलकर्णी, सुनीता रोहम, अनुपमा चौरे, डी. एस. कर्डिले, सुनीता चक्रनारायण, सिडॉन शेजूळ, चंदा ठाकरे, सिंधू आढाव, वर्षा केदार यांचा समावेश होता.
पुढील स्लाइड्सवर वाचा, डॉक्टरांनी नेमके काय केले...