आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉलेज लाईफमध्‍ये होते प्रेम, वाचा असे झाले गोपीनाथ मुंडे यांचे आंतरजातीय लग्‍न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन या दोघांच्‍या झंझावाती प्रचाराने एकेकाळी उभा महाराष्ट्र ढवळून निघाला होता. आधी जनसंघ आणि पुढे भारतीय जनता पार्टीचा प्रचार करताना या दोघांनी पक्षाची पाळेमुळे महाराष्ट्राच्या गावागावात घट्ट रुजविली होती. त्‍यांनी मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र अक्षरश: पिंजून काढला होता. याच मैत्रीचे बंध घट्ट होत गेले नि नात्‍यात बदलले. प्रमोद महाजन यांच्‍या भगिनी प्रज्ञा महाजन यांच्‍याशी गोपीनाथ मुंडे यांचा विवाह झाला. 12 डिसेंबर हा गोपीनाथ मुडे यांचा जन्‍मदिवस त्‍यानिमित्‍ताने या संग्रहात जाणून घेऊया मुंडे यांच्‍या प्रेमविवाहाबाबत.
आंबेजोगाईमध्‍ये झाले होते लग्‍न
भाजपाचे ज्‍येष्‍ठ नेते प्रमोद महाजन यांच्‍या भगिनी प्रज्ञाताई आणि गोपीनाथ मुंडे यांची ओळख महाविद्यालयीन जीवनात झाली. राजकारणातून झालेली मैत्री, मैत्रीतून झालेले प्रेम लग्‍नापर्यंत पोहोचले. गोपीनाथराव आणि प्रज्ञाताई यांनी लग्‍नाचा निर्णय घेतला. त्‍याला काही प्रमाणात विरोधही झाला. मात्र आंबेजोगाईमध्‍ये 21 मे 1978 या दिवशी हा लग्‍नसोहळा आनंदाने साजरा झाला.
आंतरजातीय प्रेमविवाहाची चर्चा
गोपीनाथराव आणि प्रज्ञा यांचा प्रेमविवाह हा आंतरजातीय होता. त्‍यामुळे त्‍याला काहीसा विरोधही होता. पण या जोडीने कोणतीही पर्वा न करता लग्‍न केले. या विवाहाची तेव्‍हा राज्‍यभर चर्चा झाली होती.
पुढील स्‍लाइड्सवर दुर्मिळ फोटोंसह वाचा असा झाला गोपीनाथ मुंडे यांचा प्रेमविवाह..