आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाबासाहेब कोलकात्‍याहून विमानाने मागवत मासळीचे पार्सल, हे मांसाहारी पदार्थ आवडायचे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आहार कमी होता. पण त्‍यांना जेवणात मांसाहारी पदार्थ लागत. मटण, मासळी व चिकनचे निरनिराळे पदार्थ ते आवडीने खात. पाश्‍चिमात्‍य देशात साहेबांचे जास्‍त वास्‍तव्‍य राहिल्‍यामुळे त्‍यांना पाश्‍चिमात्‍य पद्धतीने तयार केलेले खाद्य पदार्थ जास्‍त आवडत.
14 एप्रिलला भारतरत्‍न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 125 वी जयंती साजरी होत आहे. त्‍या निमित्‍ताने divyamarathi.com च्‍या या मालिकेत आम्‍ही आपल्‍याला बाबासाहेबांचे आवडते खाद्यपदार्थ सांगत आहोत.
डॉ. सविता भीमराव आंबेडकर यांच्‍या पुस्‍तकात उल्‍लेख..
'डॉ. आंबेडकरांच्‍या सहवासात' या डॉ. सविता भीमराव आंबेडकर लिखीत पुस्‍तकात सविता आंबेडकर यांनी बाबासाहेबांच्‍या सहवासातील विविध आठवणी लिहील्‍या आहेत. पृष्‍ठ क्रमांक 149 वर जेवणातील आवडीचे पदार्थ या लेखात त्‍यांनी बाबासाहेबांच्‍या आवडत्‍या पदार्थांचा उल्‍लेख केला आहे.
बाबासाहेब मागवत हिसला मासळीचे पार्सल..
कोलकात्‍याची हिलसा मासळी बाबासाहेबांना फार आवडे. डी. जी. जाधव कोलकात्‍याला मजूर आयुक्‍त होते. त्‍यांच्‍याकडून बाबासाहेब बर्फात घालून हिलसा मासळी विमानाने पार्सल मागवित असत.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून वाचा, बाबासाहेबांचे आवडते खाद्यपदार्थ..