आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कामाला लागले; कार्यकारिणी जाहीर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्यानंतर चार महिन्यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांनी अखेर कार्यकारिणी जाहीर केली. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांवर लक्ष ठेवून या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. शहराध्यक्ष काशीनाथ कोकाटे यांनी कार्यकारिणी जाहीर केल्यानंतर एक महिन्याने चिकटगावकर यांनी आपले कार्यकर्ते पुढे केले आहेत. नगरपालिका तसेच नगर परिषदांच्या निवडणुकांमुळे नियुक्त्यांना विलंब झाल्याचे चिकटगावकर म्हणाले.

चिकटगावकर हे राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील एकमेव आमदार आहेत. मोदी लाट असतानाही त्यांनी वैजापूर येथून विजय मिळवला. गतवेळी पैठणमधून राष्ट्रवादीचे एकमेव आमदार ठरलेले संजय वाघचौरे यांच्याकडे पक्षाने जिल्ह्याची धुरा सोपवली होती. जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी आपली टीम आता नियुक्त केली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी आपण हे पद सोडू, असे चिकटगावकर यांनी पदभार घेण्यापूर्वीच सांगितले होते. चिकटगावकर यांनी नियुक्त केलेल्या कार्यकारिणीत बहुतांश चेहरे हे नवीन आहेत. ज्येष्ठांना जिल्हा उपाध्यक्ष, सरचिटणीस तसेच सचिव या पदावर संधी देण्यात आली आहे.

खुलताबाद : अध्यक्ष भगवान कोमटे, शहराध्यक्ष निसार खान पठाण.
सिल्लोड : अध्यक्ष दत्तात्रय पांढरे, कार्याध्यक्ष शंकर जाधव, शहराध्यक्ष सय्यद जाकेर, विधानसभा अध्यक्ष राजू देशमुख.
कन्नड तालुका : अध्यक्ष बबनराव बनसोड, कार्याध्यक्ष साळुबा उबाळे, शहराध्यक्ष अहेमद अली, विधासभा अध्यक्ष सुनील चव्हाण.
सोयगाव : अध्यक्ष दीपक देशमुख, कार्याध्यक्ष डॉ. इंद्रजित साळुंके, शहराध्यक्ष रवी काळे.
वैजापूर तालुका : अध्यक्ष बाळासाहेब भोसले, कार्याध्यक्ष धीरज राजपूत, शहराध्यक्ष हमीद कुरेशी, विधानसभा अध्यक्ष गणेश चव्हाण.
औरंगाबाद तालुका : अध्यक्ष अनिल फट, कार्याध्यक्ष राजीव साळुंके.
फुलंब्री तालुका : अध्यक्ष कल्याण चव्हाण, शहराध्यक्ष याकूब शहा, विधानसभा अध्यक्ष संतोष तांदळे.
पैठण तालुका : अध्यक्ष विजय गोरे, शहराध्यक्ष भाऊसाहेब पिसे, शहर कार्याध्यक्ष हमीदखान पठाण, विधानसभा अध्यक्ष गुलदस्ता पठाण.
गंगापूर तालुका : अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर नीळ, कार्याध्यक्ष सूर्यकांत गरड, शहराध्यक्ष राजेंद्र मोरे, कार्याध्यक्ष राजेंद्र मोरे, विधानसभा अध्यक्ष वाल्मीक शिरसाट.
जिल्हा उपाध्यक्ष : हरिश्चंद्र लघाने पाटील, मोतीलाल जगताप, पांडुरंग तांगडे पाटील, अनिल जाधव, हरिभाऊ चव्हाण, खालेद नाहदी, दत्तात्रय त्रिभुवन, मंजाहरी गाढे, रणजित देशमुख, राजू वरकड, कौतिकराव पवार, अॅड. कैसरोद्दीन, प्रसन्ना पाटील, नितीन देशमुख, शफिक पटेल, मुकेश जैन.
जिल्हा सरचिटणीस : रामनाथ पाटील, शंकरराव रिठे, एल. एम. पवार, महेश उबाळे, आनंदा ढोके.
जिल्हा सचिव : प्रभाकर बारसे.
निवड