आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शहर बदलत असल्याचे चित्र सर्वांना महिनाभरातच दिसेल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - अनेक अडचणी आहेत. त्यावर मात करण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्याला निश्चित यश येईल. शहराची अवस्था बदलत असल्याचे चित्र सर्वांना महिनाभरात दिसेल, असे आश्वासन मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाला शुक्रवारी (१९ ऑगस्ट) दिले. स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या आणि डीएमआयसीसारख्या नेत्रदीपक प्रकल्प होऊ घातलेल्या औरंगाबादेतील समस्यांचा पाढा संपत नाही. याकडे लक्ष वेधणारे मूक आत्मकथन आंदोलन राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने महापालिका मुख्यालयासमोर करण्यात आले. त्याची दखल घेत त्यांनी हे आश्वासन दिले.
सकाळी ११ वाजेच्या सुमारास राष्ट्रवादीचे सुमारे ७५ कार्यकर्ते मनपासमोर जमा झाले. त्यांनी शहराच्या दुरवस्थेचे वर्णन करणारे फलक आणले होते. या फलकांवर औरंगाबाद शहराने स्वत:ची व्यथा आत्मकथेच्या रूपात मांडलेली होती. अनेकांनी या अभिनव आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. त्यानंतर आंदोलकांचे शिष्टमंडळ आयुक्तांना भेटले. त्यांना आत्मकथेची प्रत देण्यात आली. प्रारंभी त्यांनी त्यास नकार दिला. मात्र, या प्रतीद्वारे शहराची व्यथा जाणून घ्या, असा आग्रह शिष्टमंडळाचे नेतृत्व करणारे राष्ट्रवादीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य विजय वाहूळ यांनी धरल्यावर त्यांनी ती स्वीकारत वाचन केले. तुमच्यापैकी किती जण नियमितपणे मालमत्ता कर, पाणीपट्टी भरता, अशी विचारणा केली. सर्वांनी नियमित करदाते आहोत, असे म्हटल्यावर बकोरिया यांनी शहराची अवस्था बदलण्यासाठी कोणते प्रयत्न सुरू आहेत, याची माहिती दिली. तसेच महिनाभरात चित्र बदलण्यास सुरुवात झाल्याचे तुमच्या लक्षात येईल, असेही म्हटले.

कुणाचा होता सहभाग?
विनायक गुंजाळ, संदेश कांबळे, कय्युम शेख, सुमीत बनसोडे, विलास मगरे, किरण शिरवत, शंकर अडसूळ, नितीन गायकवाड, संतोष वाघ, गौतम बावस्कर, मनीष नरवडे, नीलेश काळे, गौतम जाधव, बबलू अंधारे, गौरव कदम, दीपक तुपे, गोरख राठेड, राज चौथमल, संदीप कुचे, वैभव सोनवणे, अरुण वाघ, गोल्डी मोरे, संदीप वाहूळ, सुजित चव्हाण, धीरज केंद्रे, अरुण कांबळे, अमोल भालेराव, वैभव सोनवणे.

काय म्हटले आत्मकथेत?
आशिया खंडात सर्वात वेगाने वाढणारे शहर अशी अोळख असलेल्या औरंगाबादला खड्डे, फुटलेले ड्रेनेज, कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे ओळखले जात आहे. पिण्याच्या पाण्याची प्रचंड ओरड आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाच नाही. एएमटी बससेवा, समांतर, रॅम्की, विकास आराखड्यात नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी झाली. भ्रष्टाचाराने पोखरलेल्या यंत्रणेमुळे ‘स्मार्ट’नेस हरवल्याने स्मार्टसिटीत समावेश होऊ शकला नाही. राजकारणी जाती-पातीवर मतदान मागतात आणि लोकही देतात. विकासासाठी लढणारा नेताच नाही.
बातम्या आणखी आहेत...