आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rashtriya Samaj Paksha President Mahadev Jankar Attack On Sena BJP

आम्ही मागणी केली की सेना-भाजप भांडतात - महादेव जानकर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - आमच्यामुळे सत्ता मिळाली. भाजपसोबत शिवसेनाही सत्तेत सहभागी झाली. त्यांनी मंत्रिपदे वाटून घेतली. आम्हाला मंत्रिपदे देण्याचे आश्वासन ते विसरले. आम्ही मागणी केली की दोघांमध्ये भांडणे असल्याचा बनाव करतात. त्यांचे मस्त चालले आहे, पण आम्हाला पदे द्यायचा त्यांचा विचार नसावा, अशी टीका राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केली.
स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आयोजित व्याख्यानमालेसाठी ते शहरात आले होते. त्या वेळी ते "िदव्य मराठी' प्रतिनिधीशी बोलत हेाते. जानकर म्हणाले, स्व. मुंडे यांच्यामुळेच आम्ही युतीत आलो आहोत. मात्र, मुंडे यांच्या निधनाने मित्रपक्षांची वाताहत सुरू झाली आहे. मुंडे हे दिला शब्द पाळणारे होते. ते असते तर आम्हाला सत्तेत सहभागी होता आले असते. मुंडे यांचा शब्द आम्ही मोडणार नाही. सत्तेत सहभागी करून घेतले नाही तरी मुंडे यांच्यासाठी आम्ही युतीत राहू.

त्यांनी मात्र मंत्रिपदे वाटून घेतली
भाजपसोबत आधी शिवसेना नव्हती, परंतु नंतर ते सत्तेत सहभागी झाले. त्यांनी मंत्रिपदे वाटून घेतली. आता आम्ही मंत्रिपदाची मागणी केली की दोघांचे वाद सुरू असल्याचे सांगितले जाते. हे खोटे असते पण ते खरेच भांडू लागतात. त्यांची भांडणे सुरू झाले की आमच्या कार्यकर्त्यांनाही वाटते की खरेच भांडण सुरू आहे. त्यामुळे आम्ही मागणी थांबवतो. हा खेळ सुरू आहे, असे जानकर यांनी सांगितले.

मुंडेंच्या जाण्याने माझेच नुकसान
स्व. मुंडे हे मला पित्यासमान होते. ते मला मानसपुत्र म्हणत. त्यांच्या निधनाने पंकजा मुंडे यांच्यापेक्षाही माझे नुकसान जास्त झाले. ते कधीही भरून निघणार नाही. युतीने आम्हाला सत्तेत सहभागी करून घेतले नाही, तर केवळ मुंडे यांच्या प्रेमाखातर आम्ही युतीतून बाहेर पडणार नाही, असेही त्यांनी सांगितले.