आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद शहरात पालेभाज्यांचा सुकाळ!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- पावसामुळे बाजारपेठेत मोठय़ा प्रमाणात भाजीपाला विक्रीसाठी आला असून भाज्यांच्या किमतीही कमी झाल्या आहेत. दोन आठवड्यांपूर्वी 60 रुपये किलोप्रमाणे मिळणारे टोमॅटो 20 रुपये किलो, तर पाच रुपयांत मेथीच्या दोन जुड्या मिळत आहेत. दोन आठवड्यांपूर्वी मेथीची जुडी दहा रुपयास मिळत होती.

पावसाळ्याच्या तोंडावर पंधरा रुपयाला मिळणारी मेथीची जुडी आता केवळ अडीच रुपयाला मिळत आहे. मागील महिन्यात मेथी, मिरची, कांदे आणि टोमॅटोंची आवक कमी होती. त्यामुळे टोमॅटो 60 रुपये, मिरची 40, कांदे 40 रुपये किलो, तर मेथी 10 ते 15 रुपयांना एक जुडी मिळत होती. या आठवड्यात मात्र सर्व भाजीपाल्यांचे दर निम्म्याने घटले आहेत. 20 ते 25 रुपये किलोने विक्री होणारे बटाटेही दहा रुपये किलोवर आले आहेत.

पावसामुळे उतरले दर
पावसामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनात वाढ झाली आहे. ताजा आणि लुसलुशीत भाजीपाला खराब होऊ नये म्हणून थेट शेतकर्‍यांकडून बाजारात विक्रीसाठी आणला जात आहे. एकाच वेळी आसपासच्या शेतकर्‍यांकडून भाजीपाला बाजार समितीत विक्रीसाठी येत असल्याने त्याचे दर घटले आहेत.

हिरवी मिरची 17 रु.
कांदे 14 ते 18 रु.
टोमॅटो 10 ते 20 रु.
फुलकोबी 24 ते 25 रु.
वांगी 10 ते 15 रु.
गवार 32 रु.
बटाटे 10 ते 15 रु.
मेथी 2-3 रु. जुडी
पालक 2 रु.जुडी
कोथिंबीर 2 रु. जुडी

चांगल्या पावसामुळे जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पालेभाज्यांची आवक वाढते. त्यामुळे त्यांचे दरही कमी होतात. एस. एस. बनसोड, बाजार अधीक्षक