आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ratnagiri Haapus Issue At Aurangabad, Divya Marathi

सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला रत्नागिरीचा हापूस सिडकोत विक्रीला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला रत्नागिरीचा हापूस आंबा सिडको एन-5 भागात विक्रीस उपलब्ध आहे. डॉ. तेजस मुंडे या आंब्यांची शहरात विक्री करत आहेत. दोन महिन्यांत त्यांनी 500 डझन आंबा विक्री केला आहे. ते ग्राहकांना घरपोच सेवा देत असल्यामुळे त्यांच्याकडे ग्राहकांची रीघ लागली आहे.

गतवर्षीचा दुष्काळ, यंदाची गारपीट आणि अवकाळी पावसामुळे फळबागांचे 90 टक्के नुकसान झाले आहे. त्यामुळे शहरात आंध्र प्रदेश, गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि कोकणमधून दररोज 300 ते 400 क्विंटल आंब्याची आयात होत आहे. त्याला पिकवण्यासाठी व्यापारी कॅल्शियम कार्बाइडचा वापर करतात. असा आंबा आरोग्यास हानिकारक आहे. आंब्याचे उत्पादन घेण्यासाठी भरमसाट खतांचा वापर केला जातो. त्याचे अंश फळामध्ये जातात. त्यानंतर आंबा पिकवण्यासाठी पुन्हा रसायन वापरले जाते. अशा आंब्यांमुळे अस्थमा, स्तन कॅन्सर, लिफोमा, किडनीचे आजार, अपचन आदी आजार बळवण्याचे धोके असतात. आरोग्याचे धोके टाळण्यासाठी अनेक जण सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले आंबे घेतात.

रत्नागिरी येथील उमेश लांजेकर सेंद्रिय पद्धतीने हापूस आंब्याचे उत्पादन घेत आहेत. उत्पादन कमी आले तरी चालेल, पण रासायनिक खतांचा वापर न करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. त्यांनी उत्पादित केलेले आंबे युरोप, आशियाच्या देशांत निर्यात होतात. मुंडे यांनी डॉक्टरी व्यवसाय सांभाळत लांजेकर यांच्याकडून सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला आंबा खरेदी करून ते विक्री करत आहेत.

जीओकेएम संस्थेकडून परीक्षण
जीओकेएम या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून सेंद्रिय फळे असल्याचे परीक्षण केल्याचा अहवाल बघूनच आंबा खरेदी केला. सव्वा डझन आंब्यांचा एक बॉक्स याप्रमाणे पॅकिंग केली. त्यावर न्यूट्रिशनल व्हॅल्यू टाकली आहे. एका बॉक्समध्ये 15 असून त्याची किंमत 650 रुपये आहे. सेंद्रिय व नैसगिकरीत्या पिकवलेला हापूस आंबा असल्याने ग्राहक तो आवर्जून खरेदी करतात. डॉ. तेजस मुंडे, सेंद्रिय आंबा विक्रेता.

सेंद्रिय फळ खरेदीला प्राधान्य..
डॉ. मुंडे यांच्याकडील नैसर्गिकरीत्या पिकवलेले आंबे स्वादिष्ट आहेत. रसायनात पिकवलेले आंबे सेवन केल्यास कालांतराने आरोग्याच्या समस्या निर्माण होतात, तर सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले आंबे आरोग्यवर्धक आहेत. डॉ. अमित जोशी, ग्राहक.