आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ravindra NALAWADE Suicide Case Issue At Aurangabad

रवींद्र नलावडे आत्महत्या प्रकरण: तू माझ्या मुलासारखा आहे, म्हणत अडकवले जाळ्यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - तू माझ्या मुलासारखा आहे. तुझ्या प्रगतीसाठीच मी प्रयत्न करत आहे, असे म्हणत चेतरामसिंग गुजरने रवींद्र नलावडेला भिशीच्या जाळ्यात ओढल्याची माहिती समोर आली आहे. त्याने लिहिलेल्या सातपानी सुसाइड नोटमध्ये गुजर पितापुत्रांची कृष्णकृत्ये नोंदवली असून त्यांनी एकाचा खून केल्याचेही म्हटले आहे.
रवींद्रच्या आत्महत्येनंतर आज "दिव्य मराठी' प्रतिनिधीने या भागाला भेट दिली. छावणी पोलिसांकडून रवींद्रची सुसाइड नोट मिळवली. या नोटची सुरुवातच रवींद्रने देवाच्या नावाने केली आहे. त्याने म्हटले आहे की, काय हा देवाचा नियम असतो, हे समजत नाही. मी कधी कोणाचे वाईट केले नाही. कोणाला छळले नाही. कुणाचे पैसे बुडवले नाही. दु:ख होईल असे बोललो नाही. त्यांनी मला विश्वासात घेऊन माझी फसवणूक केली. माझ्यासह अनेक जण त्यांच्या जाळ्यात अडकले आहेत.

२ कोटींचा व्यवहार
८ फेब्रुवारी २0१२ रोजी चेतरामसिंग, देवीसिंगच्या आग्रहामुळे रवींद्रने भिशीत सहभाग घेतला. त्यांचा व्यवहार दोन कोटी रुपयांपर्यंत झाला होता. २० मार्च २०१४ रोजी अंतिम हिशेब झाला. त्या वेळी माझे ५४ लाख ९00 रुपये गुजर यांच्याकडे निघाले. मात्र, गुजरने फक्त ३८ लाख ६00 रुपये देणे लागतो, असे सांिगतले होते. परप्रांतातील एकाचा त्यांनी पैशावरून खून केला होता. त्यामुळे मी पोलिसांकडे गेलो नाही, असेही त्याने म्हटले आहे.