आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Danave Comment On Corporation Election In Aurangabad

महापालिका निवडणुकीत भाजप सामूहिक नेतृत्व करणार : दानवे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मनपाच्या निवडणुकीत यापूर्वी गोपीनाथ मुंडे नेतृत्व करायचे. त्यामुळे संपूर्ण मदार त्यांच्यावर अवलंबून असायची. मात्र, आता होणाऱ्या निवडणुकीत भाजपत सामूहिक नेतृत्व राहणार असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली. मात्र, युती राहणार की नाही याबाबत त्यांनी काहीच स्पष्ट केले नाही.

एकीकडे भाजप महापालिकेत स्वतंत्र निवडणूक लढवणार असल्याचे चित्र आहे. त्या दृष्टीने भाजपच्या वतीने तयारी करण्यात येत आहे. दानवे यांनीदेखील लोणीकर यांच्या सत्काराच्या वेळी भाजपचा एकच झेंडा एकच अजेंडा असे सांगत स्वबळाचे संकेत दिले होते. निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. युतीच्या बैठकाही झाल्या नाहीत. त्यामुळे युतीबाबत आताच सांगता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आयआयएमबाबतचा निर्णय नागपूरमध्ये झाला आहे. मात्र आयआयएम गेले म्हणजे सगळे गेले असे नाही. पुढच्या काळात अजूनही चांगल्या संस्था मराठवाड्यात आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. ड्राय पोर्ट संदर्भात दरेगावजवळ ४९० एकर जमीन घेण्याबाबतचा प्रस्ताव आहे.
प्रदेशाध्यक्ष पदाचा निर्णय पक्ष घेईल
दानवे यांचे नाव सध्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चेत आहे. यासंदर्भात विचारले असता ते म्हणाले, पक्षातील वरिष्ठ नेते हा निर्णय घेतील. पक्ष जे सांगेल ती भूमिका स्वीकारण्यास मी तयार आहे. मीदेखील सध्या चर्चा एेकत असल्याचे सांगत यावर अधिक बोलणे टाळले. या वेळी शिरीष बोराळकर, आमदार नारायण कुचे, उपमहापौर संजय जोशी, बापू घडामोडे, डॉ. भागवत कराड, बसवराज मंगरुळे उपस्थित होते.