आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येत्या 15 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीचे पैसे; रावसाहेब दानवे यांचे वक्तव्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद-  येत्या 15 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीचे पैसे जमा होतील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे. पैठण येथील जाहीर सभेत त्यांनी हे वक्तव्य केले आहे.  यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना त्यांनी सरकारने दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पाळले असून येत्या 15 दिवसात तुमच्या खात्यावर पैसे जमा होतील, असे सांगितले. 
 
शेतकऱ्यांना येत्या विजयादशमीपूर्वी (दसऱ्याआधी) कर्जमाफी दिली पाहिजे या मागणीसाठी शिवसेनेने राज्यभरात जिल्हाधिकारी कार्यालयावर नुकतेच मोर्चे काढले होते. त्यानंतर दानवे यांनी आज येत्या 15 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील, असे म्हटले आहे.
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
 
बातम्या आणखी आहेत...