आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Readers Decide What Will Write Ranganath Pathare

साहित्यविश्‍व: वाचक ठरवताहेत तुम्ही काय लिहावं - रंगनाथ पठारे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - लेखक जे काही लिहितो. ते त्याचे विचार आहेत, अथवा कवितेतील कथेतील ती काल्पनिकता आहे, असे समजले जाते. परंतु लेखकाने काय लिहावे हे वाचक ठरवत आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ कथा-कादंबरीकार प्रा.रंगनाथ पठारे यांनी केले. मराठवाडा साहित्य परिषदेच्या 'साक्षात' या उपक्रमात रविवारी ते बोलत होते.
डॉ.ना.गो.नांदापूरकर सभागृहात लेखनप्रवासाबद्दल वाङ्मयीन भूमिकेबद्दल त्यांनी विचार मांडले. मसापचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील अध्यक्षस्थानी होते. कार्यवाह प्रा.दादा गोरे यांची उपस्थिती होती. प्रा.पठारे म्हणाले, एका छोट्याशा गावी माझा जन्म झाला.
गावात फक्त सातवीपर्यंत शाळा होती. परंतु ग्रंथालय होते. त्यातील पुस्तकांमुळे बालवयातच वाचनाची आवड निर्माण झाली. तेव्हाच ठरवले की, आपणही लेखक व्हायचे. कविता, कथा, कादंबऱ्या वाचत होतो. पण सुरुवातीच्या काळात आत्मटीकेची समज नव्हती. लेखकाने स्वत:चे परीक्षण करणारा टीकाकारही व्हायला हवे. आज वाचकांची अभिरुची बदलते आहे. त्यानुसार लिहिण्यासाठी लेखकाने चौफेर वाचनही केले पाहिजे. अनेकवेळा जे लिहायचे आहे अथवा सांगायचे आहे. ते लेखकाला मांडता येत नाही. त्यासाठी व्याकूळ होणे आवश्यक आहे, असेही पठारे म्हणाले. प्रसंगी साहित्यप्रेमींच्या प्रश्नांना त्यांनी उत्तरेही दिली. ठाले पाटील यांनी प्रास्ताविक केले. बाबा भांड, दासू वैद्य, डॉ.छाया महाजन, रामचंद्र काळुंखे, श्रीधर नांदेडकर, डॉ.सतीश बडवे उपस्थित होते.