आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#NoFakeNews: औरंगाबादेच्या DMart मध्ये 3 दहशतवाद्यांना अटक; NSG कमांडोची कारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शहरातील हाडको कॉर्नरजवळील ताज हॉटेलच्या मागील बाजुस असलेल्या डीमार्ट मॉलमध्ये 3 दहशतवाद्यांना अटक झाली आहे. त्यांच्याकडे मोठा शस्त्रसाठी सापडला आहे. त्यात विदेशातील अत्याधुनिक शस्त्रांचा समावेश आहे. पोलिसांनी काल (रविवारी) ही कारवाई केली आहे. ते मोठा घातपात करण्‍याच्या इराद्याने आले होते. अशी जोरदार चर्चा सध्या हॉट्‍सअॅपवर सुरु आहे. या वृत्ताची सत्यता पडताळून पाहण्याचा प्रयत्न DivyaMarathi.com ने केला आहे.

घाटीसह डीमार्टमध्ये एनएसजी कमांडोंची मॉक ड्रील, तीन दिवसांपासून पथक शहरात
दहशतवादी कारवायांचा बीमोड करण्यासाठी पोलिसांची सज्जता तपासण्यासाठी नियमितपणे मॉक ड्रील घेतली जाणार असून मॉक ड्रील कॅलेंडर तयार केले जाणार आहे. शहरातील अतिसंवेदनशील ठिकाणे आणि महत्त्वाच्या आस्थापनांनजीक आगामी काळात क्विक रॅपिड टीम आणि स्थानिक पोलिस मॉक ड्रील घेणार आहेत. अशीच मॉक ड्रील रविवारी सायंकाळी वाजेच्या सुमारास एनएसजी कमांडोंनी घाटी रुग्णालयात केली. मागील तीन दिवसांपासून हे पथक शहरात असून शहरातील विविध ठिकाणी मॉक ड्रील करून यंत्रणेची तपासणी सुरू आहे.

पुढील स्लाइडवर वाचा...  औरंगाबादेतच का घेतली मॉक ड्रील...
बातम्या आणखी आहेत...