आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जीवनशैली, हवामानातील बदलाने 25 वर्षांत बदलली मृत्यूची कारणे; पण आयुष्यमान वाढले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात झालेल्या ११.५ टक्के मृत्यूंचे कारण आहारातील बदललेल्या सवयी म्हणजे प्रामुख्याने जंकफूड हे आहे. उच्च रक्तदाब आणि कुपोषणामुळे तब्बल ३३ टक्के लोकांचा मृत्यू झाला. आहारातील बदलामुळे होणारे मृत्यू वाढले असताना १०.३ टक्के मृत्यू कुपोषणामुळे होत असल्याचे विरोधाभासी चित्र राज्यात आहे. हे बदलण्यासाठी संतुलित आहार, पुरेशी झोप आणि व्यायामाकडे लक्ष देण्याचा सल्ला तज्ञांनी दिला आहे. 


केंद्रीय आरोग्य  मंत्रालयाच्या आरोग्य संशोधन विभागाने भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर), पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडिया (पीएचएफआय) आणि इन्स्टिट्यूट  ऑफ मॅट्रायसीस अँड इव्हॅल्युएशन (आयएचएमई) यांच्या संयुक्त विद्यमाने देशातील २५ वर्षांच्या अारोग्य सेवेचा अहवाल तयार केला आहे. बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनच्या सहकार्याने बनवलेल्या ‘इंडिया : हेल्थ ऑफ नेशन्स स्टेट्स’ अहवालात १९९० ते २०१६ दरम्यानचे आरोग्य क्षेत्रातील राज्य, देशपातळीवरील बदल अभ्यासले.


हवेेचे प्रदूषण वाढले
१९९० मध्ये भारतात स्वयंपाकासाठी लाकडे जाळली जायची. यामुळे हाेणाऱ्या हवेच्या प्रदूषणामुळे ११.१ टक्के मृत्यू व्हायचे. २०१६ मध्ये ही परिस्थिती बदलली आहे. एलपीजी, वीज आणि सौरऊर्जेचा वापर वाढल्याने घरगुती हवेचे प्रदूषण घटले आहे. 

 

हवा प्रदूषणामुळे ६ टक्के मृत्यू

स्वयंपाकात लाकडाचा वापर कमी झाल्याने घरगुती हवा प्रदूषणामुळे होणारे मृत्यू ५ टक्क्यांवर आले आहेत. मात्र, या काळात वाहनांची वाढलेली संख्या, कारखान्यांतून निघणारा धूर, कचरा जाळण,े बांधकामे यामुळे धूळ आणि धूर वाढले आहेत. यामुळे २०१६ मध्ये बाहेरच्या हवा प्रदूषणामुळे ६ टक्के मृत्यू झाले. घरगुती हवा प्रदूषणात ईशान्येकडील राज्ये तर बाहेरील हवा प्रदूषणात उत्तर प्रदेश, पंजाब, राजस्थान, बिहार आणि पश्चिम बंगाल आघाडीवर आहेत.

 

विरोधाभासी चित्र
कुपोषणामुळे मृत्यूचा धोका २५ वर्षांनंतरही  कायम आहे. दुर्दैव म्हणजे एकीकडे महागड्या जंकफूडमुळे महाराष्ट्रात ११.५ टक्के मृत्यू होत आहेत. दुसरीकडे लाखो लोकांना अन्न मिळत नाही. हे विरोधाभासी चित्र आहे. 
-डॉ.अविनाश देशपांडे, जनरल फिजिशियन

 

> १९९० च्या तुलनेत २०१६ रोगांमुळे मृत्यू ३६% घटले
> जखमांमुळे होणारे मृत्यू ९ वरून १५ टक्क्यांवर वाढले आहेत. यात तरुणांची मोेठी संख्या आहे.
> एकूण मृत्यूंच्या १५% बालक, मातेच्या कुपोषणामुळे
> २०१६ मध्ये मृत्यूच्या कारणांत अशुद्ध पाण्यामुळे होणारे रोग हे ७ व्या क्रमांकावर.

 

पुढील स्‍लाईडवर पाहा, मृत्यूची कारणे...

बातम्या आणखी आहेत...