आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rebels Big Challenge Before Shiv Sena In Vitthalnagar

विठ्ठलनगर वॉर्डात बंडखोराने केली शिवसेनेची दमछाक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विठ्ठलनगर वाॅर्डात अधिकृत शिवसेना उमेदवाराची भाजप बंडखोर उमेदवाराने चांगलीच दमछाक केली आहे. भारतीय जनता पक्षाचा वॉर्ड शिवसेनेला सोडल्याने मोठा असंतोष निर्माण झाला आहे. भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी सदाशिव तुपसांडे यांनी बंडखोरी केल्यामुळे भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या विठ्ठलनगरात शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराच्या
तोंडाला चांगलाच फेस आला आहे.

विठ्ठलनगरात भाजपच्या सविता घडामोडे असून, २०१५ साठी उपरोक्त वॉर्ड भाजपने शिवसेनेला सोडला आहे. त्याबदल्यात भाजपला शेजारचा रामनगर वाॅर्ड देण्यात आला. या अदलाबदलीत भाजप पदाधिकाऱ्यांचा असंतोष शिगेला पोहोचला असून, शिवसेनेसमोर मोठे आव्हान उभे करण्यात आले आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा माजी नगरसेवक बन्सीलाल गांगवे मामा यांचे पुत्र मनोज गांगवे यांना विठ्ठलनगरातून उमेदवारी देण्यात आली आहे. अनुसूचित जातीसाठी द्य
राखीव असलेल्या जागेवर काँग्रेस व राष्ट्रवादीकडे तुल्यबळ उमेदवार नसल्याने अधिकृत आणि बंडखोरांमध्येच लढत होणार आहे.

विठ्ठलनगर वाॅर्डाचा विस्तार १९९५ मध्ये विठ्ठलनगर ते कामगार कॉलनी, चिकलठाणा असा होता. येथून भगवान घडामोडे यांनी विजय मिळवला होता. २००० मध्ये वाॅर्डाच्या चतु:सीमा बदलल्या. कामगार कॉलनी व विठ्ठलनगरचा काही भाग मिळून कामगार कॉलनी वाॅर्ड झाला व विठ्ठलनगर, प्रकाशनगर व रामनगर एक वाॅर्ड झाला. विठ्ठलनगरातून मंदा पवार भाजपच्या
तिकिटावर निवडून आल्या. २००५ मध्ये विठ्ठलनगर, कामगार कॉलनी स्वतंत्र वाॅर्ड झाला,
तर रामनगर वेगळा वाॅर्ड झाला.

काँग्रेस-राष्ट्रवादीही मैदानात
या वेळी विठ्ठलनगरातून भाऊसाहेब वाघ अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले. त्यांनी शिवसेना उमेदवार लक्ष्मण दहिहंडे व काँग्रेसचे अंकुश चौधरी यांचा पराभव केला. २००९ मध्ये महिलेसाठी राखीव असल्याने येथून सविता घडामोडे यांनी भाजपच्या उमेदवारीवर बाजी मारली. २०१५ मध्ये विठ्ठलनगर वाॅर्ड अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. उपरोक्त वाॅर्डावर भाजपचा दावा होता; परंतु युतीत वाॅर्ड शिवसेनेला सुटल्याने भाजपचे तुपसांडे यांनी येथून बंडखोरी केली. येथून काँग्रेसतर्फे वनिता भालेराव, तर राष्ट्रवादीतर्फे दीपक म्हस्के यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
एकतानगरातील दोन उमेदवारांत हाणामारी
महापालिका निवडणुकीतील वाॅर्ड क्रमांक ३, एकतानगर भागातील उमेदवार रूपचंद वाघमारे आणि डॉ. शब्बीर नसीर बेग यांच्यात गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास हाणामारी झाली. प्रथम वादावादी झाली. त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. यानंतर या भागात दगडफेकही झाली. याप्रकरणी सात जणांवर हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक एल. ए शिनगारे
यांनी दिली.