आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rebels Calm Down In MIM, MP Owaisi Changed Wardwise Candidates

एमआयएममधील बंड थंड, खासदार ओवेसींच्या हस्तक्षेपानंतर अनेक वॉर्डांत बदलले उमेदवार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चार दिवसांपासून तिकीट वाटपावरून सुरू असलेले एमआयएममधील बंड काही अंशी शमले आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष जावेद कुरेशी, डॉ. अब्दुल गफ्फार कादरी यांनी त्यांच्या मर्जीतील उमेदवारांना तिकीट दिल्याचा आरोप करीत अनेक कार्यकर्त्यांनी बंड पुकारले होते. मात्र, मंगळवारी काही वॉर्डांतील उमेदवार बदलून दिल्यानंतर नाराजांनी माघार घेतली, मात्र अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशीच खरे चित्र समोर येणार आहे.

उमेदवारांची यादी पक्षाचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी रविवारी मध्यरात्री जाहीर केली. या यादीमध्ये जिल्हाध्यक्ष जावेद कुरेशी व डॉ. अब्दुल गफ्फार कादरी यांच्या मर्जीतील उमेदवारांची नावे नव्हती. तसेच त्यांच्या समर्थकांचे पत्ते कट करण्यात आले होते. यामुळे सोमवारचा संपूर्ण दिवस गोंधळात गेला. कुरेशी यांनी सोमवारी सकाळी सहा वाजेपासून ओवेसी यांच्या मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी कुरेशी यांचा फोन घेतला नाही. त्यामुळे त्यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची धमकी दिली होती. कुरेशी आणि कादरी यांनी डॉ. महेफुजउर रहेमान यांच्या एमआरएफ टॉवरमध्ये बैठक घेतली. आम्ही उमेदवारांना शब्द दिला होता. त्याचे काय करायचे, आम्ही कोणत्या तोंडाने बाहेर जायचे, असा प्रश्न आमदार इम्तियाज जलील यांच्यासमोर केला. त्यानंतर चक्रे फिरली. आमदार जलील यांनी खासदार ओवेेसी यांना शहरातील नेत्यांच्या भावना कळवल्या. कुरेशी व डॉ. कादरी यांच्या समर्थकांना संधी द्यावी लागेल, असा आग्रह धरला. शेवटी काय निर्णय घ्यायचा तो तुम्हीच घ्या, येथे नाराजी पसरली, असे सांगून स्वत:वरची जबाबदारी झटकून दिली. ओवेसींनी सोमवारी सायंकाळी आमदार इम्तियाज यांच्याशी संपर्क साधून कोणत्या वॉर्डात बदल हवे, अशी विचारणा केली. त्यानंतर मंगळवारी उमेदवारांची सुधारित यादी समोर आली होती.

पुढे वाचा... या बदलामुळे बंड झाले शांत