आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नऊ दारू विक्रेत्यांकडून 12 हजारांचा माल जप्त; दिव्य मराठी’ने स्टिंग ऑपरेशनचा इम्पॅक्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बोरगाव अर्ज- राज्य महामार्गावरील ५०० मीटरच्या आतील सर्व बिअर बार, वाइन शॉप १ एप्रिलपासून बंद करण्यात आले. विदेशी दारू मिळत नसल्याने आंबटशौकिनांनी दुधाची तहान ताकावर भागवत असल्याने अवैध देशी दारू दुकानदारांची चांदी होत असल्याचे दिसून येत आहे.  
 
आवडता ब्रँड मिळत नाही, नशा तर करायचीच; मग देशी दारूला प्राधान्य देण्यात येत आहे. व्हीआयपी देशी पितात, मग अवैध देशीच्या केवट दुकान कधी बंद होणार, असा प्रश्न सर्व सामान्यांना पडला  होता. तर बंद झालेल्या बार चालकांनी आपल्याकडे उपलब्ध असलेला दारूचा साठा पानटपरी धारकांना हाताशी धरून विक्री करण्याचा फंडा सुरू केला होता. यासंदर्भात ‘दिव्य मराठी’ने स्टिंग ऑपरेशन करून ९ एप्रिल रोजीच्या अंकात ‘५०० मीटरचा नियम लागू आता गावागावात बार स्टॉक विक्रेत्यांची शक्कल’ या मथळ्याखाली सचित्र वृत्त प्रकाशित केले होते. 

या वृत्ताची दखल घेत वडोद बाजार पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक साईनाथ रामोड यांच्या मार्गदर्शनात  धडक कारवाईची मोहीम हाती घेतली असून आतापर्यंत ९ देशी व विदेशी दारू विक्रेत्यांवर कारवाई केली असून १२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईने अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले असून ‘दिव्य मराठी’ने प्रकाशित केलेल्या वृत्ताचे सर्व स्तरांतून आभार व्यक्त होत आहेत. ही कार्यवाही यानंतरही चालूच राहील. कुठल्याही अवैध दारू विक्रेत्यांची गय केली जाणार नाही. असा  प्रकार कुठे सुरू असल्यास माहिती द्यावी, माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे  रामोड यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.
बातम्या आणखी आहेत...