आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आडत वसुलीसाठी काँग्रेस पदाधिकाऱ्याला नोटीस, लिलावाव्यतिरिक्त मका खरेदी केल्याचे प्रकरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर- कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने परवानाधारक मका खरेदीदार व्यापाऱ्यांना लिलावाव्यतिरिक्त खरेदी केलेल्या मक्याची आडत फीस वसुलीसाठी काँग्रेसच्या एका राजकीय पदाधिकारी असलेल्या व्यापाऱ्याला कारणे दाखवा नोटीस शनिवारी बजावली आहे.
 
दरम्यान, नोटीस बजावलेल्या व्यापाऱ्याने जिल्हा परिषद निवडणुकीत एका मातब्बर नेत्याच्या कुटुंबातील महिला उमेदवाराला मदत न केल्यामुळे माझ्यावर सूडबुद्धीने बाजार समितीने ही  नोटीस काढल्याचा खळबळजनक आरोप केल्यामुळे नोटीस वादाच्या फेऱ्यात सापडली आहे. 
 
 
दरम्यान, बाजार समितीचे सभापती काकासाहेब पाटील यांनी परवानाधारक व्यापाऱ्यांनी लिलावाव्यतिरिक्त खरेदी केलेला मक्याची अवैध खरेदी असून नोटिसीप्रमाणे मार्केट फीस न भरल्यास संबंधित व्यापाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.  
 
समिती प्रशासनाने २०१६-१७ या वर्षात मका खरेदी करण्यासाठी मे. श्रीसाई ट्रेडिंग कंपनीला परवाना दिला आहे. या मका खरेदीदार व्यापाऱ्याने २० डिसेंबर ते २४ फेब्रुवारीदरम्यान लिलावाव्यतिरिक्त मोठ्या प्रमाणात  खरेदी केलेल्या  मक्याची मार्केट फीसची रक्कम भरणा करण्यासाठी टाळाटाळ करत असल्यामुळे बाजार समिती प्रशासनाने त्यांना महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री अधिनियम (नियमन) १९६३ व १९६७ चे कलम ८ (३) (क) प्रमाणे नोटीस बजावण्यात आली आहे. तीन दिवसांत लेखी स्वरूपांत नोटिसीचा खुलासा करावा असे नमूद केले आहे.  
 
व्यापारी कम राजकीय पक्षाचे पदाधिकारी असलेले सारंगधर डिके यांनी लासूरगाव गटात मी एका मातब्बर नेत्याच्या कुटुंबातील महिला उमेदवाराला निवडणुकीत मदत न केल्यामुळे माझ्यावर बाजार सभापती काकासाहेब पाटील यांनी माझ्यावर आकसबुद्धीने ही नोटीस बजावण्यात आली आहे. वास्तविक बाजार समितीच्या लिलावात आमच्या कंपनाने खरेदी केलेल्या मक्याची आडत फी आम्ही भरली आहे. लिलावाव्यतिरिक्त खरेदी केलेल्या मक्याची फी आकारण्याचा बाजार समितीला काही एक अधिकार नाही त्यामुळे मी एक रुपयाही भरणार नाही, असे त्यांनी सांगितले.  
 
सभापती काकासाहेब पाटील यांनी संबंधित व्यापाऱ्याला बाजार समितीने मार्केट फीस भरण्यासाठी वारंवार नोटीस काढून त्यांनी प्रतिसाद दिला नाही. समितीच्या आवाराव्यतिरिक्त परवानाधारक व्यापाऱ्याने खरेदी केलेली मका ही बाजार समितीच्या नियमानुसार अवैध खरेदी मानली जाते. 
 
सदरील व्यापाऱ्याकडून मार्केट फीस वसूल करण्यासाठी संचालक मंडळाने ठराव घेऊन समिती स्थापन केली आहे. त्यानुसार व्यापाऱ्यांना नोटिसा काढल्या आहेत. तीन दिवसांत फीस न भरल्यास संबंधित व्यापाऱ्यावर पोलिसांत गुन्हा नोंदविण्याची कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. 
बातम्या आणखी आहेत...