आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वसतिगृहाचे गृहपाल अहिरे निलंबित, ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत हलगर्जीपणाचा ठपका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - वसतिगृहाच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत चुकीचा कोटा दिल्याच्या ठपका ठेवत डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहाचे गृहपाल श्रीनिवास अहिरे यांना पुण्याच्या समाजकल्याण आयुक्तांनी तडकाफडकी निलंबित केले.

आमखास मैदानाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या वसतिगृहात दोन महिन्यांपूर्वी मुंबईहून आलेल्या अहिरे यांची नियुक्ती केली होती. शासनाच्या समाजकल्याण विभागाअंतर्गत चालणाऱ्या वसतिगृहात प्रवेश देण्याची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने केली आहे, परंतु अहिरे यांना याबाबत मार्गदर्शन करण्यात आले नव्हते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात ११८ प्रवेश देण्याचा कोटा असताना ऑनलाइनमध्ये त्यांच्याकडून १६४ असा आकडा पडला. यामुळे प्रवेश प्रक्रियेत अनुसूचित जातीच्या मुलांची नावे यादीत आली प्रवेश मिळाले, मात्र इतर प्रवर्गातील विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले. ऑनलाइन कोटा टाकताना हलगर्जीपणा झाल्याचा ठपका ठेवत पुणे येथील समाजकल्याण आयुक्त देवलसिंह यांनी अहिरे यांना निलंबित केले.

मला न्याय मिळावा
माझ्यावरीलकारवाई सूडबुद्धीने करण्यात आली आहे. वरिष्ठांनीच ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेबद्दलचे मार्गदर्शन केले नव्हते. चुकीने ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत अधिक जागा पडल्या. मला न्याय मिळावा. श्रीनिवासअहिरे, गृहपाल.

पुणे विभागाची कारवाई
अहिरेयांनी प्रवेश प्रक्रियेच्या कामात हलगर्जीपणा केला आहे. पुणे समाजकल्याण विभाग कारवाई करत आहे. सध्या वसतिगृहाचे गृहपाल म्हणून एस. पी. भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जे.एम. शेख, सहायकसमाजकल्याण अधिकारी.