आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेतील सिडको भागातील कुंटणखान्यावर छापा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - सिडको भागातील अहिल्यादेवी होळकर चौकात असलेल्या न्यू शिवाजी लॉजवर आज दुपारी अडीचच्या सुमारास सिडको पोलिसांनी छापा मारला. या छाप्यात तीन वेश्यांसह दोन ग्राहक आणि हॉटेल मालक व व्यवस्थापकाला अटक केली.
शरद टी पॉइंट येथील न्यू शिवाजी लॉजमध्ये कुंटणखाना सुरू असल्याची माहिती सिडको पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिस उपनिरीक्षक र्शीकांत खटके आणि त्यांच्या सहकार्‍यांनी लॉजवर छापा मारला. या छाप्यात त्यांनी नाशिक येथील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीत कामाला असलेला ग्राहक संतोष ऊर्फ विशाल भाऊसाहेब निकम (27, रा. सातपूर), गुलाम नबी पाशा खान पठाण (30, रा. भालगाव) आणि हॉटेल मालक राजू नामदेव पचलोरे (27, रा. एन-7, सिडको) व्यवस्थापक धनंजय मधुकर राणे (25) यांच्यासह एक महिला आणि दोन युवतींना अटक केली. त्यांच्याविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती उपायुक्त अरविंद चावरिया यांनी दिली.