आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Regional Parties Come Together And Target Prime Minister Modi, Divya Marathi

सेना-मनसे-राष्ट्रवादीचे टार्गेट पंतप्रधान; मोदींचा झंझावात सुरू होताच प्रादेशिक पक्ष एकवटले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - लोकसभेप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा झंझावात विधानसभेतही चालला आणि राज्यात भाजपला एकहाती सत्ता मिळाली तर प्रादेशिक पक्षांचे अस्तित्वच शिल्लक राहणार नाही या धास्तीने राज्यातील प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांना पछाडले आहे. त्यामुळे सगळे मिळून आधी मोदी नावाचे हे तुफान रोखू आणि नंतर आपसात काय भांडायचे ते भांडत बसू, असा पवित्रा शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व मनसेने घेतल्याचे चित्र आहे. परिणामी या पक्षांचे सध्या मोदी हेच लक्ष्य आहे.

महत्वाकांक्षा असूनही राज्यापुरतेच अस्तित्व हे राष्ट्रवादी व शिवसेनेचेही वैशिष्ट्य. मनसेने तर ठरवून आपली कक्षा राज्यापुरती मर्यादित करून घेतली आहे. कॉंग्रेसचे तसे नाही. राष्ट्रीय पक्ष असल्याने राज्यात हरले तरी पक्ष संपण्याचा धोका त्यांना नाही. त्यामुळे कॉंग्रेस नेते राष्ट्रवादीला लक्ष्य करत असले तरी राष्ट्रवादीने मात्र मोदींवर निशाणा साधला आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही मोदींनाच लक्ष्य केले आहे. राज ठाकरेंनीही थेट मोदींवर हल्ले चालवले आहेत. याचा अर्थ हे पक्ष निवडणुकीनंतर एकत्र येतीलच असा काढता येत नाही.

मोदी मैदानात, उतरताच धसका
भाजपची रणनीती
* केंद्र व राज्यात एकाच पक्षाचे सरकार असेल तर विकासाला गती हा मोदींचा युक्तिवाद.
* महाराष्ट्र पुढे गेला, तरच देश पुढे जाईल आणि महाराष्ट्र गुजरातचा मोठा भाऊ असल्याची मोदींची वक्तव्ये.
* शिवरायांचा आदराने उल्लेख. मोदींकडून अस्मिता जपणे.
* बीडमध्ये मुंडेंबद्दल गौरवोद्गार.बाळासाहेबांविषयी आदरयुक्त भाषा.

आधी आदर, नंतर आगपाखड
- शरद पवार
१७ मार्च
मोदींना दंगलीत कोर्टाने निर्दोष ठरवले आता आम्ही त्यांना जबाबदार धरू नये.
०६ ऑक्टोबर
मोदींनी पदाची प्रतिष्ठा जपावी. सीमेवर हल्ले, पण मोदींना देशाची नसून, पक्षाचीच चिंता.
- उद्धव ठाकरे
२७ सप्टेंबर
नरेंद्रभाईंवर टीका करणार नाही. वेळ कमी असल्याने टीकेत वेळ घालवणार नाही.
०५ ऑक्टोबर
मोदींनी प्रचारासाठी करण्यापेक्षा सत्तेचा वापर शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी करावा.
- राज ठाकरे
०९ मार्च
मोदी पंतप्रधान व्हावेत ही इच्छा. आमचे खासदार लोकसभेत त्यांना पाठिंबा देतील.
०५ ऑक्टोबर
मोदी स्वत:च प्रचाराला फिरणार असतील तर पीएमओ १५ दिवस बंद ठेवणार काय?

नेते का धास्तावले...
* मोदींच्या राज्यभर २२ सभांचे नियोजन
* मोदींच्या सभांना होणारी लाखोंची गर्दी
* मोदींच्या वक्तृत्व शैलीची पडणारी छाप
* सभांचे वृत्तवाहिन्यांवरून थेट प्रक्षेपण
* परदेश दौरे, कामांचे यशस्वी मार्केटिंग
* जनमत चाचण्यांत भाजपचे पारडे जड
* केंद्रीय मंत्र्यांच्या सभांचा धडाका.

विरोधासाठी मुद्दे
* मोदींनी पालघरची सागरी सुरक्षा अकादमी गुजरातला नेण्याचा मुद्दा.
* एअर इंडिया, रिझर्व्ह बँकेचे विभाग दिल्ली येथे हलवणे.
* गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन यांचे उद्योजकांना निमंत्रण.
* मुंबईची गोदी हलवण्याचे प्रयत्न