आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जीएसटी शिथिल केल्याने शहरातील 15 हजार छोट्या व्यापाऱ्यांना दिलासा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- केंद्रीय अर्थमंत्र्यांनी जीएसटी परिषदेत शुक्रवारी रात्री जीएसटी कायद्यातील काही कडक निर्बंध शिथिल केले. याचा औरंगाबाद शहरातील एकूण ३० हजारपैकी १५ हजार व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. हे सर्व व्यापारी छोटा व्यवसाय करणारे आहेत. या निर्णयामुळे आता सीएच्या ऑफिसवर न बसता दुकानातील गल्ल्यावर बसता येईल, अशी प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी दिल्या. गेले दोन महिने दिवसरात्र काम करणाऱ्या सीए संघटनेनेही सरकारचे कौतुक केले आहे. 
 
जुलै रोजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी देशात जीएसटी कायदा लागू केला, पण त्याची अंमलबजावणी करताना खूप कडक धोरण अवलंबल्याने व्यापारी नाराज होते. जीएसटी नेटवर्कवर रिटर्न भरले जात नव्हते. इनपुट क्रेडिट मिळाल्याने व्यापाऱ्यांची झोप उडाली होती. सरकारला औरंगाबादच्या व्यापारी महासंघाने काही बदल सुचवले होते. एक महिन्यापूर्वी त्याचे निवेदन केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांना दिले होते. त्यातील ७० टक्के मागण्या पूर्ण झाल्याचे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अजय शहा यांनी सांगितले.

आता तिमाही रिटर्न : छोट्याकिरकोळ व्यापाऱ्यांना दरमहिन्याला जो रिटर्न्सचा ससेमिरा होता तो रद्द करून सरकारने सवलत दिली आहे. आता दर तीन महिन्यांनी रिटर्न भरावा लागेल. 
 
छोट्यांना मोठा दिलासा : कपडा,किराणा माल विकणारे छोटे व्यापारी, इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिकसह इतर सर्व वस्तूंची ठोक किरकोळ भावाने विक्री करणारा, पण ज्याची उलाढाल २० लाखांच्या वर नाही अशा शहरातील १५ हजार व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 

वातानुकूलित रेस्टॉरंटमध्ये बसतील 
सीए उमेश शर्मा म्हणाले की, वातानुकूलित रेस्टॉरंटमध्ये ग्राहक बसला की १८ टक्के कर लागत होता. आता हा कर १२ टक्के केल्याने शहरातील किमान शंभर हॉटेलचालकांना हा फायदा होणार आहे. 

सरकारचे अभिनंदन 
अाम्ही सुचवलेल्या७० टक्के मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. यामुळे रिटर्न भरण्याची प्रक्रिया सहज सोपी होईल. 
- अजय शहा, अध्यक्ष, व्यापारी महासंघ 

स्वागतार्ह निर्णय 
आम्ही दोन महिने अहोरात्र जीएसटीची कामे करत होतो. सरकारला फीडबॅक दिला. या निर्णयाचे स्वागत करतो. 
- अलकेश रावका, अध्यक्ष, सीए संघटना 
 
उशिरा सुचलेले शहाणपण 
सरकारला अनेक स्मरणपत्रे पाठवली होती. हा आमच्या फीडबॅकचा विजय आहे. हे सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण आहे. याचा फायदा सर्वांना होईल. 
- रोहन आचलिया, सीए
बातम्या आणखी आहेत...