आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Relexation To Consumers, Oil Rate Come Down By 10 Rupee

ग्राहकांना दिलासा, तेलाचे भाव दहा रुपयांनी उतरले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - महागाईने पिचलेल्या सामान्य नागरिकांना बुधवारी खुशखबर मिळाली. गगनाला भिडलेल्या तेलाच्या किमती 10 रुपयांनी कमी झाल्या आहेत. 120 रुपये प्रतिकिलोप्रमाणे विकल्या जाणार्‍या शेंगदाणा तेलाचा भाव आता 110 रुपये झाला आहे. करडई, सोयाबीन तेलाचे दरही 10 रुपयांनी उतरले आहेत. नवीन दर गुरुवारपासून लागू होतील, अशी माहिती व्यावसायिकांनी दिली.

यंदा मलेशिया आणि अमेरिकेतून तेलाची आवक मुबलक झाली आहे. समाधानकारक पाऊस झाल्याने पिकाचे उत्पादनही वाढेल, असा अंदाज बांधण्यात येत आहे. परिणामी तेलाचे दर कमी होत असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. श्रावण महिन्यात सण मोठय़ा प्रमाणात असतात. उपवास आणि व्रतवैकल्ये केली जात असल्याने सामान्य दिवसांच्या तुलनेत या काळात तेलाचा अधिक वापर होतो. त्यामुळे सणांच्या तोंडावर तेलाचे कमी झालेले दर ग्राहकांच्या दृष्टीने समाधानकारक बाब आहे.

तेल आणखी स्वस्त होणार
श्रावणात 10 ते 15 रुपयांनी तेलाच्या किमती आणखी खाली उतरणार आहेत, असा दावा गुलमंडी येथील बसैये शुद्ध तेल भांडारचे संचालक जगन्नाथ बसैये यांनी केला.


पाऊस समाधानकारक असल्याने पिके चांगली येतील. याचा परिणाम म्हणून आतापासूनच तेलाच्या दरात घट होत आहे. मात्र, नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर देशाबाहेरून होणारी तेलाची आयात वाढली की कि मतीही चढतात. जगन्नाथ बसैये, तेल व्यावसायिक.


तेलाचे नवीन दर असे
तेल जुने दर नवीन दर
शेंगदाणा 120 110
डबल रिफाइंड 125 115
करडई 120 110
डबल रिफाइंड 125 115
सोयाबीन 75 72
वनस्पती तूप 70 65 (किलोमध्ये)
सरकी रिफाइंड 68 65