आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदार खैरे हटवा, समांतर वाचवा!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - गत दहावर्षांपासून होऊ घातलेल्या समांतर जलवाहिनीचे काम अद्याप सुरू झालेले नाही. खर्चात तीन पटीने वाढ झाली आहे. याला खासदार चंद्रकांत खैरे यांची हटवादी भूमिका यास जबाबदार आहे. समांतर जलवाहिनी होणे शहरासाठी नितांत गरजेचे आहे. तेव्हा ‘समांतरचे राजकारण बंद करा’, ‘खासदार खैरे हाय-हाय’, ‘खैरे हटवा, समांतर वाचवा’च्या घोषणांनी महापालिका परिसर दणाणनू गेला.

राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता महापालिकेसमोर खासदार खैरे यांच्या हटवादी भूमिकेविरोधात आंदोलन केले. ‘समांतरचा बट्टय़ाबोळ’ अशी नारेबाजी असलेला फलक हातात घेऊन त्या फलकावर समांतर जलवाहिनीचे कल्पनाचित्र रेखाटण्यात आले होते. दुसर्‍या बाजूने खैरे यांचे रेखाचित्र काढण्यात आले. त्यांच्या हातात पैसे घेण्यासाठी कटोरा देण्यात आला. त्या कटोर्‍यात जलवाहिनीतून पैसे पडत असल्याचे दाखवण्यात आले. हे रेखाचित्र लक्षवेधी ठरले. शहरासाठी अत्यावश्यक असलेली समांतर योजना गत दहा वर्षांपासून कागदावर आहे.