आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Remove Mud From Harsool Lake Divisional Commissioner Order

हर्सूल तलावातील गाळ काढण्याचे काम सुरू करा, विभागीय आयुक्तांचे आदेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - हर्सूल तलावातील गाळ लवकरात लवकर काढलाच पाहिजे, असे सक्त आदेश आज विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांनी मनपाला दिले. तलावात होत असलेले अतिक्रमण खुलेआम सुरू असलेली टरबूज, खरबुजाची शेती पाहून संतापलेल्या आयुक्तांनी तलावातील अतिक्रमणे काढा तलावाची मोजणी करून हद्द संरक्षित करण्याचे आदेश दिले. यासाठी काय पत्रे लागतील ते सांगा, मी आदेश देऊन ही पत्रे उपलब्ध करून देतो, असेही ते म्हणाले.

हर्सूल तलावातील गाळ काढण्यासाठी दोन वर्षांपूर्वी अालेले दोन कोटी रुपये तसेच पडून अाहेत. मागची दोन्ही वर्षे मनपाने गाळ काढण्याचे काम टाळले. यंदाही हे काम टाळण्याकडेच मनपाचा ओढा असताना ‘दिव्य मराठी’ने १७ एप्रिलच्या अंकात याबाबतचे वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर मनपाही हलली आता तर विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांनीच पुढाकार घेतला. आज सकाळी सहा वाजताच दांगट मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी या तलावाला भेट दिली. तलावाची या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत बारकाईने पाहणी करताना दांगट यांनी मनपाने या तलावाकडे का दुर्लक्ष केले, असा प्रश्न केला. त्यांनी मनपाच्या कामाबाबत नाराजीही व्यक्त केली. गाळ काढण्याचे काम कधी सुरू करणार, असा प्रश्न त्यांनी विचारला, त्यावर मनपा अधिकाऱ्यांनी दिवस असे उत्तर दिले. तलावाच्या पात्रात करण्यात आलेले अतिक्रमण पाहून तर त्यांनी हे बांधकाम झालेले मनपाच्या लक्षात आले नाही का, असा सवाल करत अधिकाऱ्यांना ते कधी इकडे येतात की नाही, असा सवालच केला. गेल्या वर्षी हा गाळ काढण्यात मनपाने टाळाटाळ केली होती. आता लवकरच गाळ काढण्याच्या सूचना दांगट यांनी मनपाला दिल्या आहेत. किमान दहा ते पंधरा पोकलेन लावून गाळ काढावा, अशी सूचना दिली आहे. गाळ काढल्यामुळे पाण्याच्या साठवण क्षमतेत वाढ होईल. तसेच शेतकऱ्यांनादेखील हा गाळ लाभदायक ठरणार आहे. विभागीय आयुक्त, मनपा आयुक्तांच्या या भेटीच्या वेळी शहर अभियंता सखाराम पानझडे, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, उपअभियंता वसंत निकम, तहसीलदार विजय राऊत, तालुका अभिलेखमधील मोजणी अधिकारी पी. एन. कपोते उपस्थित होते.

आता याउलट घडत आहे. पदव्युत्तर पदवीच्या परीक्षांना कालावधी बाकी आहे. २९ मे रोजी सेट असून विद्यार्थी या परीक्षेचा अभ्यास करत आहेत. पण कुलगुरूंच्या मान्यतेने डॉ. मोराळे यांच्या स्वाक्षरीने सर्व वसतिगृहांना २० एप्रिल रोजी नोटीस चिकटवली असून ३० एप्रिलपर्यंत सर्व विद्यार्थ्यांनी वसतिगृहे रिकामे करावीत, असे बजावले आहे. काही विद्यार्थ्यांना टंचाईमुळे वसतिगृहे सोडावी लागतील, असे डॉ. मोराळे यांनी तोंडी सांगितले आहे. पुढील शैक्षणिक सत्रात ज्यांचे पदव्युत्तर पदवीचे द्वितीय वर्ष आहे, त्यांनाही वसतिगृह रिकामे करण्यास सांगितल्यामुळे विद्यार्थी हैराण झाले आहेत. सेट परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ग्रंथालयाची आवश्यकता आहे. त्यामुळे वसतिगृहांत राहण्याची मुभा त्यांना हवी आहे.

दांगट यांच्या सूचना
> हर्सूल तलावाची मोजणी करून हद्दी कायम कराव्यात. सिमेंटचे पोल लावावेत, मनपाचे बोर्ड लावा
> तलावाच्या पात्रात असलेले अतिक्रमण तातडीने काढा
> तलावाच्या चारही बाजूंनी चर खोदण्यास सांगितले आहे. त्यामुळे बाहेरून जनावरे अथवा माणसे तलावाच्या पात्रात येणार नाहीत
> तलावाच्या ज्या भागात पाणी नाही त्या बाजूला वन विभागाच्या वतीने बांबूची लागवड करावी

हर्सूल तलाव
४५० एकर आकार
६.२५ दलघमी साठवण क्षमता
२७ फूट तलावाची खोली
१८ किती वाॅर्ड अवलंबून
०५ एमएलडी रोजचा पाणीपुरवठा

भेटीमुळे टँकर बंदच
हर्सूल तलावातील पाणी टँकरमार्फत विकण्याचा मोठा धंदा आहे. रोज तलावातून ३०० ते ४०० फेऱ्या हे टँकर्स करत असतात. आज विभागीय आयुक्त येणार असल्याची बातमी या टँकर लाॅबीपर्यंत पोहोचवण्यात आल्याने एकही टँकर आले नाही.
छायाचित्र: उमाकांत दांगट यांनी हर्सूल तलावाची पाहणी करून माहिती जाणून घेतली.