आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोनईकर महाराजांंनी स्थापली सातारा परिसरात रेणुकामाता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - बीडबायपास रोड, सातारा येथील रेणुकामातेचे मंदिर शक्तिपीठ म्हणून प्रसिद्धीस अाहे. योगीराज हंसतीर्थ हरिहरानंद महाराज अर्थात सोनईकर महाराजांनी १९९८ साली रेणुकामातेचा तांदळा तयार करून देवीची स्थापना केली. या मंदिरात रेणुका देवीचा तांदळा आहे. त्याच्या खाली तळघरात महादेवाची पिंड आहे. खाली शिव आणि वर आदिशक्ती देवी असणारे हे शहरातील एकमेव मंदिर आहे. या मंदिरात वर्षभरात पाच नवरात्र साजरे होतात. देवीच्या दर्शनासाठी शहर आणि परिसरातील भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. चोवीस तास देवीची आराधना सुरू असते. तसेच नवरात्रोत्सव विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी भाविकांना मिळते.
हरिहरानंद महाराज हे अण्णा महाराज नावानेही ओळखले जातात. त्यांनी आयुष्यभर पायी फिरून देशातील अनेक देवीच्या स्थानांची ओळख भक्तांना करून दिली. अनेक देवींचा लुप्त झालेला मंदिरांचा जीर्णोद्धार केला आणि ती नावारूपाला आणली. बीड बायपास येथे स्वत: अण्णा महाराज एका झोपडीत मुक्कामाला होते. तेथे त्यांनी अनुष्ठान केले. याच ठिकाणी त्यांनी १९९८ साली रेणुकामातेचा तांदळा केला. या जागेवर भक्तांनी भव्य मंदिर बांधण्याचा संकल्प केला आणि वर्षभरात मंदिर तयार झाले. महाराजांचे लहान चिरंजीव आप्पा महाराज हे या मंदिराची पूर्ण जबाबदारी सांभाळतात. महाराजांनी घालून दिलेल्या नियमानुसार मंदिराची वाटचाल सुरू आहे. अत्यंत प्रसन्न वातावरण लाभलेले हे मंदिर शहरातील निराळे म्हणून प्रसिद्ध आहे. मंदिराच्या परिसरात दरवर्षी देवीची स्थापना करून अतिशय सुंदर देखावा तयार करण्यात येतो.
पहाटे पाच ते रात्री बारा वाजेपर्यंत नवरात्रात देवीचा जागर सुरू असतो. सकाळी पाच वाजता मंदिर उघडताच भूपाळी होते. त्यानंतर दररोज नवीन कलावंत शास्त्रीय संगीताची सेवा देतो. सकाळी नऊ वाजता शक्तिसार्थ नावाच्या ग्रंथाचे पठण होते. दुपारी बारा वाजता महाआरती, दुपारी ते पर्यंत महाप्रसाद त्यानंतर आरती होते.

या ठिकाणी वर्षभरात पाच प्रकारे नवरात्र साजरे करण्याची परंपरा असल्याची माहिती तेथील सेवक कचरू जाधव यांनी दिली. शारदीय नवरात्र सर्वात मोठा उत्सव असतो. या काळात पहाटे पाच ते रात्री बारापर्यंत विविध कार्यक्रमांची रेलचेल असते. नवरात्रात सायंकाळी ते भक्तिसंगीताची मैफल, त्यानंतर पूजा होते. त्या वेळी देवीची अंबाबाईची महाआरती, दृष्ट काढणे, झुला असे कार्यक्रम होतात. रात्री ते बारापर्यंत पंचपदी होते. याबरोबर पौष महिन्यात शाकंभरी नवरात्र, रामनवमी उत्सवात चैत्री नवरात्र, आषाढात योगिनीमातेचे नवरात्र, खंडोबाचे नवरात्र असे एकूण पाच नवरात्र वर्षभरात साजरे केले जातात.
बातम्या आणखी आहेत...