आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उड्डाणपुलाशेजारील खराब रस्ते दुरुस्त करा, औरंगाबाद खंडपीठाने दिले आदेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जालना रस्त्यावरील तीन उड्डाणपुलांचे काम सुरू असून या पुलांच्या शेजारील उखडलेले रस्ते दुरुस्त करण्याचे आदेश खंडपीठाचे न्या. एस. एस. शिंदे ए. एम. बदर यांनी दिले आहेत.

अवैध वाहतुकीसंबंधीची सुमोटो याचिका पुन्हा सुनावणीस निघाली असता हायकोर्टाने या प्रकरणात जबाबदार असलेल्या विविध विभागांना निर्देश दिले. यासंबंधी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त, मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रादेशिक परिवहन अधिकारी, राज्य रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता आदींची ऑक्टोबरमध्ये बैठक घेण्यात आली होती. बैठकीत कृती आराखडा तयार करण्यात आला होता. त्यानुसार अवैध वाहतूक रोखण्यासाठी विविध उपाययोजना सुचवण्यात आल्या होत्या. शहरातील जालना रस्त्यावर बाबा पेट्रोल पंप ते एपीआय कॉर्नरदरम्यान तीन उड्डाणपुलांचे काम सुरू आहे. महावीर चौक बाबा पंप, मोंढा नाका सिडको बसस्थानक चौक येथील उड्डाणपुलांचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने सुरू आहे. सिडको बसस्थानक उड्डाणपुलाचे काम जलदगतीने व्हावे यासाठी नागरिकांनी आंदोलन केले होते.
पुलांच्या कामामुळे वाहतुकीस अडथला निर्माण होत असून, बाजूंचे रस्ते खराब झाल्याने त्याचा ताण वाहतुकीवर पडत असल्याचे हायकोर्टाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. यावर हायकोर्टाने पुलाशेजारील रस्त्यांचे काम करण्याचे निर्देश दिले. प्रत्येक उड्डाणपुलाच्या कंत्राटदारास लेखी कळवल्याचे रस्ते विकास मंडळातर्फे सांगण्यात आले.