आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Reporter Murder Case After 11year Accused Arrest

पत्रकाराचा खून करणारा फरार आरोपी जेरबंद

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - प्रेयसीच्या मदतीने तिच्या भावाचा काटा काढणार्‍या तरुणाला सिडको पोलिसांनी अकरा वर्षांनंतर हडकोतील शरद टी पॉइंटजवळ रविवारी रात्री अटक केली. शेख रहिमोद्दीन शेख शरीफोद्दीन ऊर्फ रहीम (38) असे त्याचे नाव आहे. त्पाच साथीदारांच्या मदतीने बुलडाणा येथील पत्रकार किशोर रावळकर याचा तलवारीने वार करून खून केला होता.

कैलासनगरमधील विवाहिता शोभा ताराचंद लाडचे शेख रहिमोद्दीनसोबत अनैतिक संबंध होते. त्याला बुलडाणातील भाऊ किशोर रावळकर याचा विरोध होता. 2002 मध्ये शेख रहिमोद्दीन याने साथीदार जहांगीर खान, संजय सुरसे, जावेद शेख, मुश्ताक शेख यांच्यासह शोभाला कारने बुलडाण्याला पाठवले. तेथे चौघांनी त्याच्यावर तलवारीने वार केले. पोलिसांनी शेख रहिमोद्दीन आणि शोभासह चौघांना अटक केली होती, परंतु शेख रहिमोद्दीन घटनास्थळी नसल्याने त्याची जामिनावर मुक्तता झाली. न्यायालयात हजर राहत नसल्याने बुलडाणा न्यायालयाने शेख रहिमोद्दीन विरुद्ध वॉरंट जारी केले.