आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विविध उपक्रमांनी प्रजासत्ताक दिन साजरा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - शहरात सोमवारी सकाळी शासकीय, निमशासकीय, शाळा, महाविद्यालये, संस्था, संघटनेच्या वतीने ६६वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळपासून विविध परिसरात प्रभातफेरी काढण्यात आली. यात विद्यार्थ्यांनी लेझीम पथकाचे सादरीकरण आणि घोषणांनी शहर दणाणले. मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहणानंतर भाषणे, लेझीम पथकाचे सादरीकरण, मानवी मनोऱ्याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. तसेच स्वच्छता अभियान, वाहन रॅली, रक्तदान शिबिरे उपक्रम राबवण्यात आले.
पोलिस आयुक्तालयाच्या मैदानावर शहरातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी लक्ष वेधणाऱ्या लेझीम पथकांचे सादरीकरण करण्यात आले.