आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झेंडावंदनानंतर तरुणाई करील ‘फुल टू धमाल’

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रजासत्ताक दिनानिमित्त स.भु. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध योजना आखल्या आहेत. सकाळी झेंडावंदन आणि त्यानंतर दै. ‘दिव्य मराठी’चे एमजीएम मैदानावरील विक्रमी ‘जन गण मन’ झाल्यानंतर ही सर्व तरुण मंडळी आखलेल्या योजनेप्रमाणे धमाल करणार आहे. कुणी सिद्धार्थ गार्डन, तर कुणी अजिंठा-वेरूळला, तर कुणी चित्रपट पाहण्यासाठी जाणार आहेत, तर एनएसएसचे काही विद्यार्थी संध्याकाळपर्यंत रस्त्यावर पडलेले झेंडे एकत्रित करून त्यांना पर्यावरण बचाव समितीच्या स्वाधीन करणार आहेत.
सिद्धार्थ गार्डनला भेट देणार - प्रत्येक प्रजासत्ताकदिन कायमस्वरूपी लक्षात राहावा, यासाठी दरवर्षी आम्ही नवनवीन प्लॅन बनवतो. यावर्षी बाहेर न जाता आम्ही 50 मित्र-मैत्रिणी सिद्धार्थ गार्डनमध्ये सहलीला जाणार आहोत. झेंडावंदनानंतर मिळणारा संपूर्ण दिवस त्या ठिकाणी आनंदात घालवणार आहोत. सहलीला येणारा प्रत्येक जण स्वत:च्या हाताने स्वयंपाक करणार आहे, अशी अट या वेळेस ठेवण्यात आली आहे. - श्वेता नाईक, बी.एस्सी.पी.एम.सी.एम.
‘अग्निपथ’ पाहायला जाणार - सकाळी झेंडावंदन झाले की फर्स्ट डे फर्स्ट शोमध्ये अग्निपथ चित्रपट पाहणार आहोत. या सिनेमाला सर्व ग्रुप एकत्र जाणार आहोत. या दिवसाचे प्लॅनिंग ब-याच दिवसांपासून केले होते. - मंगेश क्षीरसागर, बी.एस्सी. स्टॅटिस्टिक्स
खूप शॉपिंग करणार - प्रोझोनमध्ये सध्या सेल लागला आहे. यामुळे सर्व मित्र-मैत्रिणी एकत्र शॉपिंग करणार आहोत. नवीन ड्रेस, टॉप, जीन्स, नेकलेस, बॅग्स अशा अनेक वस्तू खरेदी करण्याचा विचार आहे. मम्मी-पप्पांना जास्तीचा पॉकेट मनी फार मस्का लावून मागितला आहे. - कोमल भोईरे, बी.एस्सी. द्वितीय वर्ष, पी.एम.सी.एम.
रस्त्यावरील झेंडे गोळा करणार - प्रजासत्ताकदिन साजरा केल्यानंतर मित्रांसोबत रस्त्यावर पडलेले झेंडे उचलणार आहे. ज्या झेंड्यासाठी अनेक देशभक्तांनी बलिदान दिले त्याला रस्त्यावर पडलेले पाहू शकत नाही. झेंड्याला असे पाहून दु:ख होते. त्यामुळे ही योजना आखली. - चेतन जाधव, बी.एस्सी.पीसीएम
घरच्यांसोबत साजरा करणार - जे विद्यार्थी 26 जानेवारीला महाविद्यालयात येत नाहीत, त्यांचे समुपदेशन करतो. यामधून देशभक्तीची भावना जागृत होते. या दिवशी सकाळी 5 पासूनच सर्व मित्र-मैत्रिणींना फोन करून उठवणार आहे. झेंडावंदन व कार्यक्रम झाल्यावर मी माझ्या घरी पुण्याला जाणार आहे आणि घरच्यांसोबत हा दिवस साजरा करणार आहे. - धीरज दलाल, बी.एस्सी. प्रथम वर्ष, पीईसीएस