आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद - शहरातील शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था, शासकीय, निमशासकीय कार्यालयांत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम, देशभक्तिपर गीतांसह लेझीम, बॅँड, परेड आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. स्नेहसंमेलनाच्या बक्षीस वितरणाचे कार्यक्रम घेण्यात आले. काही शाळांत पाणी वाचवा, मुलगी वाचवा असे संदेश देण्यात आले.
ऑक्सफर्ड पब्लिक स्कूल
डम्बेल्स, लेझीम आदी कवायतींद्वारे पाणी वाचवा, मुलगी वाचवा, असा संदेश देण्यात आला. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ.मो.जहिरोद्दीन पटेल होते, तर लियाकत पटेल, मुख्याध्यापिका तहनियत पटेल,एम.ए.हलीम यांची प्रमुख उपस्थिती होती. कमलेश गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. वैशाली कोंबडे यांनी आभार मानले.
फाउंडेशन स्कूल
संस्थेचे विश्वस्त ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी अडथळ्यांची शर्यत, लिंबू चमचा, थैला रेस तसेच संगीत खुर्ची स्पर्धा घेण्यात आली. धावण्याच्या स्पध्रेत प्ले ग्रुपमध्ये आदित्य राजपूत, साहिल ठाकूर, अडथळ्यांच्या शर्यतीत नर्सरीतून शिवराज भोसले, आयुष आडे, लिंबू चमचामध्ये एल.के.जी. मधून भारत नोनीया, प्रांजल पल्हाल तर थैला रेसमध्ये यू.के.जी.तून , उदयन गायकवाड, ऋत्विक डोईफोडे यांनी यश मिळवले. पालकांमधून भूपती राजू, सुशील भाले, अमोल पुराणिक, स्नेहल पाटील, प्रसन्न कडगई, सुवर्णा लताड, उज्ज्वला गोरे, संगीता थोरात, सुनीता निकम, स्वाती भोसले यांनी यश मिळवले.
वात्सल्य मूकबधिर विद्यालय
मुख्याध्यापक बाळू दाभाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. संस्थेचे कार्याध्यक्ष आसिफ पटेल,संतोष नजन, रफत देशमुख यांची उपस्थिती होती. कै.रामचंद्र नाईक प्राथमिक विद्यालय बाळकृष्ण नाईक यांच्या हस्ते ध्यजारोहण करण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गीते सादर केली. श्याम नाईक, दत्ता काळे, राजेंद्र पवार यांची उपस्थिती होती. पुष्पा गीते यांनी सूत्रसंचालन केले. राजेश्वर गायकवाड यांनी आभार मानले.
बापू पटेल उर्दू अस्थिव्यंग विद्यालय
जाकीर पटेल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सलमा बेगम, नाजीम पठाण, शेख यास्मीन यांची उपस्थिती होती.
मधुर मतिमंद निवासी विद्यालय
जाकीर पटेल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सलमा बेगम, डी.के.महाजन, सय्यद आमिन, इरफान पटेल, शबाना बेगम यांची उपस्थिती होती.
राधाई विद्यालय
राहुल तौर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. संस्थेच्या सचिव साधना कदम, डॉ.संतोष लोमटे यांची उपस्थिती होती. प्रा.महेंद्रकुमार रंगारी यांनी सूत्रसंचालन केले.
ज्योती विद्या मंदिर
डॉ. पी. एस. जैस्वाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. संस्थेचे उपाध्यक्ष अँड.आर.डी.देशपांडे, अँड.सुधीर कुलकर्णी, मुख्याध्यापिका सुनंदा चव्हाण, माजी विद्यार्थी डॉ.रमेश गाढे, चेतन मुळे, पालक प्रतिनिधी सुभाष साळवे यांची उपस्थिती होती. विद्या भगत यांनी सूत्रसंचालन केले.
जय अंबिका विद्यामंदिर
संस्थेचे सचिव मोहन चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. डी. आर. खोकड, एम. जी. पळसकर, बी.बी. सारक यांची उपस्थिती होती. यानिमित्त क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. मनीष जगदाळे यांनी सूत्रसंचालन केले.
पटवर्धन हॉस्पिटल
पटवर्धन हॉस्पिटलमध्ये प्रजासत्तादिनी ध्वजारोहण करण्यात आले. डॉ.दिलीप पटवर्धन, डॉ. दीपाली पटवर्धन, डॉ.जुनेद फारूकी, चंद्रभान म्हस्के, गणेश बावले यांची उपस्थिती होती.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती
प्रा.विजय गवई,प्राचार्य सिद्धांत गाडे, डॉ.एम.आर. आमले यांची उपस्थिती होती. या वेळी स्वातंत्र्य चळवळीवर गीत सादर करण्यात आले. देवानंद वानखेडे यांनी सूत्रसंचालन केले.
एकता एज्युकेशनल अँड कल्चरल इन्स्टिट्यूट
या वेळी देशभक्तिपर गीतांचे सादरीकरण करण्यात आले. याप्रसंगी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
शिवछत्रपती विद्यालय व महाविद्यालय
प्राचार्य अशोक मुखेकर, वंदना मुखेकर, उदय डोंगरे, राजू दहिहंडे यांची उपस्थिती होती. जी.के.पवार यांनी सूत्रसंचालन केले. आर. एस. शेळके यांनी आभार मानले.
संत कबीर प्राथमिक शाळा
नगरसेवक कृष्णा बनकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कमलेश बोर्डे, एस. एन. मोरे यांची उपस्थिती होती. आर.व्ही.मोकाशे यांनी सूत्रसंचालन केले. बी.टी.भामरे यांनी आभार मानले.
हेमलता पाटणी नर्सिंग कॉलेज
एम. सी. जैन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी प्रा.डॉ.राजेश पाटणी यांची उपस्थिती होती.
साकोळकर नर्सिंग स्कूल
बॅरिस्टर अँड.अश्विन साकोळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष अँड. विजय साकोळकर, डॉ.आशा साकोळकर, प्रेमराज पाटील, अँड.धीरज कोटे, डॉ.कविता पाटील, डॉ.नंदा भावसार, एम.बी.चोरघडे यांची उपस्थिती होती.
अनंत भालेराव विद्यामंदिर
ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा.रं.बोराडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी शशिकला बोराडे, स्वाती इनामदार यांची उपस्थिती होती. याप्रसंगी ‘स्वच्छंद’ या हस्तलिखिताचे विमोचन करण्यात आले. बकुल देशपांडे, डॉ.मंगला चरखा, शैलजा चपळगावकर, उज्जवला भोसले, डॉ. क्षमा पांगरेकर,सरिता भालेराव यांची उपस्थिती होती.
पायोनियर्स सेकंडरी स्कूल
विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या साहित्याचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. नारायण कुलकर्णी, संस्थेच्या सचिव प्रफुल्लता कुलकर्णी, कोशाध्यक्ष सुषमा बाभुळगावकर, संदीप कुलकर्णी, मधुरा रोगे, ज्योती पाटील, पौर्णिमा राजहंस यांची उपस्थिती होती.
बालाजी हायस्कूल व महाविद्यालय
जगन्नाथ दहिहंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. आर.व्ही. हंकारे, व्ही.एम.राठोड, बापू दहिहंडे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. एस.के.कुलकर्णी सूत्रसंचालन केले.एन.व्ही. पवार यांनी आभार मानले.
राष्ट्रीय माध्यमिक विद्यालय
ढोल, लेझीम पथकासह प्रभातफेरी काढण्यात आली. प्राचार्य रामदास नीळ यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. वंदना चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.
नालंदा प्राथमिक शाळा
न्यायमूर्ती नाना शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. एम. पी.जाधव, बी.एस.म्हस्के यांची उपस्थिती होती. प्रा. डी. एम. कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. एस. एस. पैठणे यांनी आभार मानले.
ज्ञानसागर उच्च प्राथिमिक शाळा
के.व्ही. वाघमारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गीते आणि लेझीमचे सादरीकरण केले. या वेळी वार्षिक स्नेहसंमेलनातील विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय
कार्यक्रमाला अँड.माधव बोर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती. नगरसेवक कृष्णा बनकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. मुख्याध्यापक एस. एन. मोरे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. आर.व्ही.मोकाशे यांनी सूत्रसंचालन केले. बी.टी.भामरे यांनी आभार मानले.
व्यंकटेश अध्यापक विद्यालय
व्यंकटेश अध्यापक विद्यालयात आयोजित प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाला बापू घडामोडे, गणेश उकले, प्रा. प्रवीण दाणे, प्रा. रार्जशी चौधरी यांची उपस्थिती होती.
गजानन बहुद्देशिय प्राथमिक शाळा
ध्वजारोहण कार्यक्रमाला राजेंद्र जैस्वाल, प्रकाश पाखरे, मिलिंद दामोधरे, स्मिता जैस्वाल, एल.के. एकलारे यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. वाय.व्ही.हुसे यांनी सूत्रसंचालन केले.डी.एस.नाईकवाडे यांनी आभार मानले.
नेताजी सुभाष हायस्कूल
अपर्णा मोहरीर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. एन. एस. आदके, मुकुंद निकाळजे यांची प्रमुख उपस्थिती होती.
ज्ञानज्योत स्कूल
नीला जगताप यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. उज्ज्वला डवले यांनी सूत्रसंचालन केले, तर रेखा भोकरे यांनी आभार मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.