आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रजासत्ताकदिनी खादी खरेदीकडे कल

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर खादीला महत्त्व आले आहे. अनेकांनी खादी खरेदीकडे खादीचे झेंडे आणि स्टाइलिश कपडे खरेदी मोठ्या प्रमाणावर होत आहे. गेल्या काही वर्षांपासून खादीला मिळालेल्या मॉडर्न टचमुळे तरुणाईचा ओढा याकडे वाढला असून, पारंपरिक झब्बा आणि कुर्ता, जिन्स, मोदी शर्ट आणि बुशर्ट तरुणाईचे आकर्षण ठरत आहे.
प्रजासत्ताक दिनानिमित्त खादी ग्रामोद्योग केंद्रामार्फत राष्ट्रध्वज तयार केले जातात. ध्वज खरेदीसाठी अ‍ॅडव्हान्स बुकिंग करण्यात आली आहे. ध्वजाबरोबर तिरंगी बॅचलाही मागणी होत आहे.
फॅशनेबल खादीची क्रेझ - पूर्वी नेहरू शर्ट आणि पायजामा तरुणवर्गाच्या पसंतीस उतरत नव्हता. पण अलीकडे जिन्स, फॅशनेबल बुशर्ट, मोदी शर्ट, जॅकेट खरेदी केली जात आहे. खादीची यंदा वर्षभरातील 40 टक्क्यांची उलाढाल झाली असून, खादी केंद्राला 17 लाख रुपयांचा नफा झाला असल्याची माहिती खादी ग्रामोद्योगाचे व्यवस्थापक ध. वी. राऊत यांनी दिली. शहरातील खादीच्या दुकानांवर पुरुषांसह महिलांचीही खरेदीसाठी गर्दी दिसून येत आहे. तसेच राष्ट्रीय ध्वज खरेदी करण्यासाठी शहरातील विविध शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालयातील कर्मचारी मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत.