आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रजासत्ताकदिनी फडकणार सर्वात उंच राष्ट्रध्वज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - क्रांती चौकातील राणी लक्ष्मीबाई उद्यानामध्ये उभारण्यात आलेल्या २०० फूट उंच स्तंभावर २६ जानेवारी रोजी देशातील सर्वात मोठा पॉलिमरचा राष्ट्रध्वज फडकणार आहे. त्याची जोरदार तयारी सुरू अाहे. ६० फूट बाय ९० फुटांचा महाकाय ध्वज फडकवण्यासाठी राज्य शासनाकडे विशेष परवानगी अर्ज करण्यात आला आहे. पॉलिमरचा ध्वज लावण्यापूर्वी खादीच्या राष्ट्रध्वजाची तालीम घेतली जाणार आहे.
झाशी राणी उद्यानाचा चेहरा मोहरा १९५६ नंतर बदलला जात आहे. या उद्यानाला १८५७ च्या क्रांतीची पार्श्वभूमी असल्यामुळेच या भागाला क्रांती चौक म्हणतात. इंग्रजांनी उठाव करणाऱ्या २४ क्रांतिवीरांना उद्यानाच्या बाजूलाच असलेल्या काळ्या चबुतऱ्यावर फाशी दिली होती. या क्रातिवीरांच्या स्मरणार्थ १९५६ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी भुजंगराव कुलकर्णी यांनी राणी लक्ष्मीबाई उद्यान तयार केले.

काय आहे केवलार पॉलिमर : केवलारहे एक असे पॉलिमर आहे जे बुलेटप्रूफ जॅकेट निर्मितीसाठी वापरले जाते. याच केवलारपासून ६० बाय ९० मीटर आकाराचा राष्ट्रध्वज तयार होत आहे. पण त्यासाठी अजून सरकारकडून परवानगी मिळणे बाकी आहे. तोवर खादीच्या राष्ट्रध्वजाची ट्रायल सुरू राहील. पॉलिमरच्या ध्वजावर वातावरणाचा परिणाम होणार नाही.

२० हजार चौरस फुटांवर उद्यान : पूर्वीउद्यानाची जागा ४५ हजार चौरस फूट होती. मनपाने काही जागा व्यावसायिकांना करारावर दिल्याने आता फक्त २० हजार चौरस फूट राहिली आहे. यावर अद्ययावत उद्यान होत आहे. यासाठी एक समिती गठित करण्यात आली अाहे.

पॉलिमरचा ध्वज : दूरवरूनहा राष्ट्रध्वज नजरेस पडावा यासाठी २०० फूट उंच खांब रोवण्यात आला आहे. कापडी ध्वज ऊन, पावसात टिकणार नाही, म्हणून केवलार नावाच्या पॉलिमरपासून तयार केला जात आहे. तो स्वयंप्रकाशित असेल.

सरकारची परवानगी बाकी
हा महाकाय पॉलिमरचा ध्वज २६ जानेवारीला फडकावण्याची तयारी सुरू आहे. पण सरकारची परवानगी बाकी आहे. तोवर खादीच्या ध्वजाने ट्रायल घेतली जाईल. स्मारकासाठी सामान्य देणगी देऊ शकतात. त्यासाठी सीएमआय कार्यालय किंवा शहरातील दुकानांत पावती पुस्तके ठेवली आहेत. एक रुपयासुद्धा नागरिक देऊ शकतात.
बातम्या आणखी आहेत...