आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदेशात संशाेधनासाठी हवी दाेन मंत्रालयांची परवानगी ; राज्यपालांचे विद्यापीठांना अादेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अाैरंगाबाद- शैक्षणिक क्षेत्रातील संशाेधन करण्यासाठी देशाबाहेर जायचे असल्यास यापुढे कुलगुरूपासून सर्व अधिकारी शिक्षकांना केंद्रीय गृह मंत्रालय परराष्ट्र मंत्रालयाची परवानगी घ्यावी लागेल, या विभागांना संपूर्ण माहिती द्यावी लागेल. राज्यपाल तथा कुलपतींनी नुकतेच याबाबतच सर्व विद्यापीठांना अादेश दिले अाहेत.

यापूर्वी विद्यापीठ अथवा महाविद्यालयस्तरावरील अधिकारी किंवा प्राध्यापक केवळ संंबंधित महाविद्यालयांची परवानगी घेऊन सरकारी पैशावर विदेश दाैरा करत असत. त्यांच्या दाैऱ्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाला असे, परंतु विदेशात जाऊन त्यांनी काय संशाेधन केले याबाबत माहिती गृहमंत्रालयाला देण्याची गरज भासत नव्हती. मात्र देशात घडणाऱ्या विविध घटनांचा सखाेल तपास करताना तपास यंत्रणातील अधिकाऱ्यांना अडचणी येत असत. एकूणच सर्व माहिती गृहमंत्रालयात असावी या उद्देशान हे पाऊल उचलले असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, सरकारी पैशावर हाेणाऱ्या विदेश दाैऱ्यांचा संबंधित विद्यापीठांना कितपत फायदा हाेताे, याबाबत शंका उपस्थित केल्या जातात. केवळ सरकारी निधी खर्च करण्यासाठीही काही दाैरे हाेत असल्याच्या तक्रारी असतात. मात्र अाता त्यांच्या दाैऱ्याची कारण मीमांसा हाेणार असल्याने अशा दाैऱ्यांना अाळा बसण्याची शक्यता अाहे.

अजून फायनल झाले नाही
> दोन मंत्रालयांची परवानगी घेऊन विदेश दौरा करण्यासंदर्भात अजून शैक्षणिक धाेरण तयार करण्यात आलेले नाही. प्रशासकीय पातळीवर कार्यवाही सुरू आहे. कुलगुरू यावर निर्णय घेतील. -- सतीश पाटील, बीसीयूडी, बाबासाहेब अांबेडकर मराठवाडा विद्यापीठ अाैरंगाबाद.
बातम्या आणखी आहेत...