आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गांधीजींनी नेताजींचे ऐकले असते तर १९४० मध्येच स्वातंत्र्य मिळाले असते

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- दुसऱ्या महायुद्धामुळे इंग्लंडला स्वरक्षणाची चिंता होती. त्यामुळे भारतात जर लष्करी बंड झाले असते तर इंग्लंडमधून अतिरिक्त फौज पाठवणे त्यांना शक्य नव्हते. त्यामुळे संपूर्ण असहकार पुकारून इंग्रजांची कोंडी करावी, असे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे ठाम आणि अभ्यासपूर्ण मत होते. टपाल खात्यातील कर्मचाऱ्यांपासून ते तहसीलदार, जिल्हाधिकाऱ्यां पर्यंतच्या तत्कालीन भारतीय अधिकाऱ्यांनी इंग्रज सरकारचे आदेश पाळायचेच नाही, असा निग्रह या आंदोलनात करावा, असेही त्यांनी मांडले होते. परंतु महात्मा गांधी यांनी त्यांना परवानगी नाकारली. ती त्यांनी दिली असती तर १९४० मध्येच भारत स्वतंत्र झाला असता, असा दावा राजहंस प्रकाशनाचे संपादक, प्रख्यात संशोधक आनंद हर्डीकर यांनी केला.
‘दिव्य मराठी’च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त मसापच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात ‘नेताजी सुभाषचंद्र बोस तुम्ही कोठे आहात?’ या विषयावर दोनदिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात मंगळवारी (१२ मे) त्यांनी पहिले पुष्प गुंफले. अध्यक्षस्थानी उद्योजक अनिल भालेराव होते.
हर्डीकर यांनी जुने संदर्भ, पुरावे, दस्तऐवजांच्या आधारे विषयाची अतिशय सखोल मांडणी केली. ते म्हणाले की, तत्कालीन इंग्रजांच्या लष्करातील भारतीय सैनिकांची देशनिष्ठा वाढवावी इंग्रजांशी थेट युद्ध पुकारावे. दुसरीकडे इतर वर्गातून असहकार पुकारावा, असे नेताजींचे मत होते; परंतु काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नेताजींनी गांधीजींच्या उमेदवाराला पराभूत केल्याचा राग गांधींना होताच. तरीही सर्व विसरून नेताजी गांधीजींच्या भेटीसाठी १९४० मध्ये गेले. इंग्रजांशी असहकार करावाच; पण तुम्ही म्हणता त्या नेहमीच्या पारंपरिक पद्धतीने नव्हे, असे त्यांनी गांधीजींना सांगितले. परंतु संपूर्ण असहकार्य म्हणजे ‘मॉरली अनजस्टिफाइड’ असे कारण देत गांधीजींना स्पष्ट नकार दिला. त्यामुळे परागंदा होण्याशिवाय नेताजींसमोर पर्याय नव्हता. नेताजींचे परागंदा होणे हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे आग्ऱ्याहून परागंदा होण्यासारखेच होते. म्हणजे तेथून त्यांनी छुप्या पद्धतीने देशाच्या स्वातंत्र्याचे काम सुरू केले, कारण लढल्याशिवाय काहीही मिळणार नाही, असे त्यांचे ठाम मत होते, असेही ते म्हणाले.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, छत्रपती शिवाजी महाराज नेताजींचे आदर्श...
बातम्या आणखी आहेत...